कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करणार :  प्रकाश आंबेडकर

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करणार :  प्रकाश आंबेडकर

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कोरेगाव भीमा आयोगा सोबत एक चर्चा झाली कारवाई सुरू आहे. मी काही मुद्दे उपस्थिती केले आहे आणि चौकशी करायला सांगितली आहे. आयोगाने लेखी प्रतिज्ञापत्र स्वरूपात सादर करावे, असे सांगितले आहे. त्यामुळे  २४ जुलैला मी प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. तीन महत्वाचे मुद्दे मांडणार आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी दिली.  पुणे जिल्हा परिषेच्या जुन्या इमारतीमध्ये असलेल्या कोरेगाव भीमा चौकशी आयोगाच्या सदस्यांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

पावसाळी अधिवेशनातून शेतकरी आणि राज्यातील शेतकऱ्यांना काय मिळेल, असा प्रश्न आंबेडकर यांना विचारला असता, ते म्हणाले राज्य सरकारला शेतकऱ्याचे काही देणे घेणे नाही. रविवारी  झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी सगळ्यात शेवटी असल्याचे दिसून आले. दुबार पेरणीचे संकट आहे याची माहिती यांना आहे का ? असा सवाल करत राज्यातील सरकार हे खिशे भरू आहे, अशी टीकाही केली.

यंदा अजित पवारांना दिवाळी एकट्याला साजरी करावी असं वाटत. पुढच्या वर्षी तरी कुटुंबासोबत दिवाळी करतील, असे आंबेकर यांनी सांगितल. वंचित बहुजन आघाडी भाजप बरोबर जाणार नाही पुढे कोणाबरोबर जाऊ माहिती नाही, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news