

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सध्या शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. मात्र, पावसाचा जोर वाढताच दरवर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत डेंग्यूचे प्रमाण वाढते. त्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आतापर्यंत 497 आस्थापनांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून, यावर्षी 1 लाख 15 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात जुलै महिन्यात आतापर्यंत डेंग्यूचे 66 संशयित रुग्ण आढळून आले.
त्यापैकी 12 जणांमध्ये डेंग्यूचे निदान झाले. मागील वर्षी जुलै महिन्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 62 इतकी होती. यावर्षी एप्रिल, मे आणि जून महिन्यांत डेंग्यूचा एकही रुग्ण आढळून आला नाही. मात्र, आता पावसाला सुरुवात झाल्याने काळजी घेतली जात आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली. आरोग्य विभागाने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय पातळीवर स्वतंत्र पथक तयार केले आहे. आतापर्यंत 497 जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून, 1 लाख 15 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीत 538 संशयित रुग्ण आढळून आले. यापैकी 33 जणांमध्ये डेंग्यूचे निदान झाले आहे.
हे ही वाचा :