कोल्‍हापूर : औद्योगिक वसाहत उभी करताना स्‍थानिकांचे मत जाणून घेणे गरजेचे : सतेज पाटील

File photo
File photo

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा शिरोळ तालुक्यातील अकिवाट-सैनिक टाकळी येथील गायरान जमीन ताब्यात घेण्याच्या हालचाली प्रशासनाने गतिमान केल्या आहेत. आज (बुधवार) दुसऱ्या दिवशी राज्यात, जिल्ह्यात आणि तालुक्यात इतर ठिकाणी कोठेही औद्योगिक वसाहत उभी करण्याच्या दृष्टिकोनातून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू नाही. मात्र या ठिकाणीच का? असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी अतिक्रमण हटाव मोहीम बंद पाडली. यावेळी ग्रामस्‍थ आणि शेतकऱ्यांनी अतिक्रमण हटाव मोहीमेसाठी आलेल्‍या अधिकाऱ्यांना घेराव घातला.

याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचे मत जाणून घेतले असता, ते म्हणाले की, कोणतीही औद्योगिक वसाहत उभी करत असताना स्थानिक रहिवाशी नागरिकांचे मत जाणून घेणे गरजेचे आहे. त्यांना विश्वासात घेऊन उभी केलेली वसाहत योग्य ठरणारी आहे. विरोध असेल तर राज्य सरकारने त्याबाबत विचार करावा असे ते म्‍हणाले.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news