खा. संजय मंडलिक म्हणाले, ‘मंत्री हसन मुश्रीफ, संजय घाटगे आम्ही सर्व एकच’

खा. संजय मंडलिक म्हणाले, ‘मंत्री हसन मुश्रीफ, संजय घाटगे आम्ही सर्व एकच’

Published on

हमीदवाडा(कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : भाजपचा देशातील वारू कोल्हापूरने अडवला आहे. मी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजय घाटगे आम्ही सर्व एकच असून यापुढे कागल तालुक्यातही जातीयवाद वाढू नये यासाठी एकत्र करू, असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले. कोण कधी जन्माला आला यापेक्षा काम महत्वाचे आहे, असा टोला खा. संजय मंडलिक यांनी लगावला.

कौलगे (ता. कागल) येथील 12 कोटीच्या विकासकामे उद्घाटन व लोकार्पण समारंभात खा. संजय मंडलिक प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संजय घाटगे होते.

यावेळी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून मी, खा. संजय मंडलिक व माजी आमदार संजय घाटगे आम्ही एकत्रच आहोत. एखाद्या माणसाने कुठल्या दिवशी जन्मावं आणि तो दिवस नसावा, याविषयी संशोधन व्हावं हा दुर्दैवी प्रसंग आहे.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, मधल्या काळात काम करत-करत ना. मुश्रीफ आणि संजय घाटगे हे मला जरा विसरले होते. परंतु आम्ही एकत्रच आहोत. माझा वाढदिवस गुढीपाडव्यादिवशी आहे. पण, आता तिथीच्या वादात पडायला नको म्‍हणत मी तारखे प्रमाणे वाढदिवस करायचा ठरवले आहे, असे ते म्‍हणाले.

माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, मंत्री मुश्रीफ हे रामनवमीला जन्मले आहेत. आता मी त्यादिवशी जन्मलो नाही त्याला काय करूया.? असे घाटगे म्‍हणाले.

गुरुबंधू अन पुढील खासदार..!

जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर तालुक्यात प्रथमच मुश्रीफ, मंडलिक व घाटगे एकत्र आले. यावेळी बोलताना ना. मुश्रीफ म्हणाले, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहापुढे खा.मंडलिक यांना झुकावं लागलं व वेगळे पॅनेल तयार करावं लागलं. त्यामुळे थोडे मतभेद जरी झाले असले तरी माझ्या नेत्याचा मुलगा आणि छोटा गुरुबंधू असल्यामुळे काहीही झालं तरी आम्ही एकत्रच आहोत. पुढील खासदार देखील संजय मंडलीकच असतील.

यावेळी सौ. शिवानी भोसले, शशिकांत खोत, प्रवीण भोसले, अरुण भोसले, विकास पाटील, के. के. पाटील, गजानन कांबळे, अरुण पाटील आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक नंदू पाटील यांनी केले तर आभार तानाजी सातपुते यांनी मानले.

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news