कोल्‍हापूर : फोंडा घाटात वृक्ष कोसळला; वाहनांच्या रांगा, प्रशासनाच्या कार्यतत्‍परतेने दीड तासात वाहतूक पूर्ववत

फोंडा घाटात वृक्ष कोसळला
फोंडा घाटात वृक्ष कोसळला
Published on
Updated on

राशिवडे; पुढारी वृतसेवा वेळ मध्यरात्री दीड दोनची, ठिकाण राधानगरी फोंडाघाट, अचानक रस्त्यावर भलेमोठे झाड पडले होते. खासगी ट्रँव्हल्स कंपनीच्या ड्रायव्हरने याची माहिती १०० व १०१ या हेल्पलाईन नंबरवर कळविली. आणी बघता-बघता सार्वजनिक बांधकाम विभाग, राधानगरी तहसीलदार आणी पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत अवघ्या दीड तासात रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. त्‍यामुळे तालुक्यातील या आपत्‍कालीन टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राधानगरी फोंडा घाटामध्ये जोरदार पाऊस आणी सोसाट्याच्या वाऱ्याने अचानक भलेमोठे झाड रस्त्यावर कोसळले. त्‍यामुळे कोकणकडून येणाऱ्या व कोकणकडे जाणाऱ्या वाहनांच्या भल्यामोठ्या रांगा या मार्गावर लागल्या होत्या. कार्यतत्परतेने खाजगी ट्रँव्हलसच्या ड्रायव्हरने १०० व १०१ या आपतकालीन दुरध्वनीवर काँल करुन या प्रकाराची माहिती दिली. काही अवधीतच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शिवाजी इंगवले, तहसीलदार अनिता देशमुख आणी पो.नि.ईश्वर ओमासे, वनविभागाचे कर्मचारी आपल्या टीमसह जाग्यावर पोहोचले आणी अवघ्या दीड ते दोन तासात रस्ता वाहतुकीसाठी खुला करुन दिला.

आपत्‍कालीन घटनेनंतर शासकीय यंत्रणेने तात्काळ मदत करत वाहतुकीचा मार्ग खुला केल्याने वाहनचालकांसह प्रवाशांनी प्रशासनाचे आभार मानले. तासनतास तात्कळत न ठेवता कमी कालावधीमध्ये रस्ता खुला करणाऱ्या या आपत्‍कालीन टीमचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीसप्रमुख महेंद्र पंडीत यांनी आभार मानुन या या टीमवर कौतुकाचा वर्षाव केला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news