

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज (दि.२४) भरपावसात विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले. सरकारने कर्जत- जामखेड येथील एमआयडीसीला मंजूरी रोखल्याच्या निषेधार्थ रोहीत पवार यांनी हे आंदोलन केले. 'दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार!' असा फलक हातात घेवून यावेळी त्यांनी सरकारचा निषेध केला.
माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीचा प्रश्न आश्वासन देऊनही सरकार मार्गी लावत नाही. सरकार दबावाच्या राजकारणाला बळी पडत आहे. उपोषण हाच आता अखेरचा पर्याय आहे, असे रोहीत पवार यांनी म्हटले आहे. एमआयडीसीला मंजुरी मिळाली पाहीजे, कर्जत जामखेडच्या तरूणांना रोजगार मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा :