कोल्हापूर : पन्हाळा गडावर ईद नंतर मुस्लिम बांधवांकडून शिवजयंती साजरी

कोल्हापूर : पन्हाळा गडावर ईद नंतर मुस्लिम बांधवांकडून शिवजयंती साजरी
Published on
Updated on

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : किल्ले पन्हाळा गडावर रमजान ईद, अक्षय्य तृतीया व शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आज सकाळी येथील मुस्लिम बांधवांनी इदगाह मैदानावर ईद उल फितरची नमाज अदा केली. ईद नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी घरी जाण्यापूर्वी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पन्हाळा येथील मंदिरात जाऊन दर्शन घेत शिवजयंती साजरी केली.

नमाजसाठी पन्हाळा पावनगड, आपटी, बुधवारपेठ, मंगळवार पेठ, गुरुवार पेठ, सोमवार पेठ आदी गावातील मुस्लिम समाजातील बांधव प्रार्थनेसाठी एकत्र आले होते. यावेळी हाफिज असिफ महात यांनी विश्वशांतीसाठी दुआ करत पारंपरिक पद्धतीने ईद साजरी केली. मुस्लिम बांधवांनी ईद नमाजनंतर घरी जाण्यापूर्वी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पन्हाळा येथील मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी किल्ले पन्हाळा मुस्लिम जमियतचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्री मूर्तीवर पुष्पहार अर्पण केला. यावेळी मुस्लिम बांधवांनी जय शिवाजी, जय भवानीचा गजर केला.

पन्हाळ्यात सर्व समाजात बंधूभाव जोपासला जातो, हे आज ईदच्या दिवशी पुन्हा एकदा दाखवून दिले. यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी म्हणाले की, किल्ले पन्हागडावर सर्वधर्म समभाव जोपासला जातो. सर्वजण एकत्र येऊन सर्वच सण साजरे करतात. आज ईद व शिवजयंती एकत्र आली असताना मुस्लिम बांधवांनी ईदच्या नमाजनंतर प्रथम हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन मगच घरी जाऊन नातेवाईक पै पाहुणे यांच्या ईदच्या भेटीगाठी घेण्याचा निर्णय घेतला. आज हा योगायोग आला, पन्हाळ्यातील बंधूभाव अखंड जोपासला गेला याची धन्यता वाटते. हा सलोखा पुढील पिढी देखील अखंड जोपासत राहील. यावेळी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर पुजारी संचित भाडेकर, नगरजी हनिफ, दगडू अतिग्रे आदी उपस्थित होते.

पन्हाळा पोलीस ठाण्यात देखील आज मुस्लिम बांधवांना ईद निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, रमेश ठाणेकर व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. मुस्लिम बांधवांनी ईद नंतर शिवजयंती साजरी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात जाऊन आदरांजली वाहिली. कोल्हापूर जिल्हा व पन्हाळ्यात असा बंधूभाव जोपासला जातो याचे हे प्रतीक म्हणावे लागेल.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news