पुढारी ऑनलाईन डेस्क : शुक्रवारी सायंकाळपासून पावसाचा जाेर कमी झाल्याने (Kolhapur Rain Update) पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होत आहे. गुरुवारी सायंकाळपासून राजाराम बंधार्यावरील पंचगंगेची पातळी कमी होतअसल्याचे दिसून येत आहे. आज (दि. १६) सकाळी ११ वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७.९ फुटांवर आली आहे. (पंचगंगा नदी इशारा पातळी – ३९ फूट व धोका पातळी – ४३ फूट आहे). जिल्ह्यातील एकुण ६१ बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी ( दि. १५) दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 67.8 मिमी पाऊस झाला. गेल्या २४ तासात तालुकानिहाय पाऊस कंसात मि.मीमध्ये : हातकणंगले ( ७.४), शिरोळ ( ७.५), पन्हाळा ( २७.७), शाहूवाडी ( २३.६), राधानगरी( ३९.९) गगनबावडा ( ६७.८ ) , करवीर ( १८), कागल ( १५.६), गडहिंग्लज ( १९.५),भुदरगड( ४०.१), आजरा ( ४७.९), चंदगड ( ५२.३). एवढा पाऊस झाला आहे.
पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होत असली तरीही दिवसभरात सुमारे 40 ते 50 टक्के ग्रामस्थांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. प्रयाग चिखलीच्या बहुतांश ग्रामस्थांनी पुनर्वसन झालेल्या सोनतळी ठिकाणी आसरा घेतला आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत चिखलीतील सुमारे अडीच ते तीन हजार तर आंबेवाडीतील 800 ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासन 'अॅक्शन मोड'मध्ये आले असून, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संभाव्य पूरबाधित परिसराची पाहणी केली आहे.
०२३१-२६५९२३२
०२३१-२६५२९५०
०२३१-२६५२९५३
०२३१-२६५२९५४
टोल फ्री क्र. १०७७
जिल्हा नियंत्रण कक्ष 24 तास सुरु
हेही वाचा