कोल्हापूर: गवसेजवळ ११ कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त

कोल्हापूर: गवसेजवळ ११ कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त
Published on
Updated on

आजरा: पुढारी वृत्तसेवा : गवसे (ता.आजरा) जवळ आजरा पोलिसांनी १० कोटी ७४ लाख १० हजार किंमतीची व्हेल माशाची उलटी आज (दि. २७) जप्त केली. आतापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. व्हेल माशाच्या उलटीचे वजन १० किलो ६८८ ग्रॅम आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

याप्रकरणी कुडाळच्या पाच जणांना ताब्यात घवण्यात आले आहे. कुडाळ येथून व्हेल माशाची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती आजरा पोलिसांना मिळाली. त्यानुसार आजरा पोलिसांनी आंबोली आजरा मार्गावर सहायक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासून सापळा रचला होता.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news