कोल्हापूर : संभाजीराजे १२ मे रोजी भूमिका स्पष्ट करणार?

File Photo
File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेच्या सदस्यपदाचा कार्यकाल 3 मे रोजी संपला आहे. यानंतर ते आता कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान. ते आपली राजकीय भुमिका 12 मे रोजी स्पष्ट करणार असल्याचे समजते.

गेली ६ वर्षे ते राष्ट्रपती नियुक्त खासदार राहिलेले आहेत. त्यांची पुढील राजकीय भुमिका काय असेल, आगामी लोकसभा निवडणूक ते लढणार का अशा अनेक प्रश्नांवर आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. संभाजीराजे एकला चलो रे चा नारा देणार असल्याची शक्यतादेखील वर्तविली जात आहे. संभाजीराजेंना आपल्या पक्षात घेण्यासाठी काही राजकीय पक्ष प्रयत्नात आहे.

कार्यकाल संपल्यामुळे पुढे राजकीय प्रवास कसा असेल, या प्रश्नावर संभाजीराजे छत्रपती यांनी याआधी म्हटले होते की, "राजकारण मला लागू नव्हतं. पण इथून पुढे राजकारणात उतरायचं आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे दिल्ली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मी रमतो. दोन्हीकडे माझा संपर्क वाढलेला आहे. त्यामुळे दिल्ली आणि महाराष्ट्र दोन्ही डोळ्यांसमोर ठेवून राजकारणात सक्रिय होणार आहे", अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली होती.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news