सातारा : कस्तुरींना मिळणार कृषी पर्यटनाची संधी | पुढारी

सातारा : कस्तुरींना मिळणार कृषी पर्यटनाची संधी

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सहलीचा आनंद तोही मैत्रिणींच्या समवेत लुटण्याची संधी दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबकडून सदस्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी दै.‘पुढारी’कस्तुरी क्लबतर्फे रविवार दि. 8 मे रोजी खास कस्तुरीच्या सदस्यांसाठी संजीवनी कृषी पर्यटन केंद्र, भोसे जि. सांगली येथे एक दिवशीय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

कृषी पर्यटनाचा आनंद देणार्‍या या सहलीसाठी मर्यादित जागा असल्याने सदस्यांनी त्वरित आपले नाव नोंदवावे. दैनंदिन धावपळीतून स्वत:साठी वेळ काढून टेन्शन फ्री व्हावे, कधीतरी मैत्रिणींसमवेत मस्त बागडावे, दंगा-मस्तीसह मनसोक्त आनंद लुटावा अशी प्रत्येकीचीच इच्छा असते. मैत्रिणींसोबत सहल एन्जॉय करण्याची मजा काही वेगळीच असते. महिलांची हौस ‘कस्तुरी क्लब’ तर्फे पूर्ण होणार आहे. कस्तुरी क्लबतर्फे संजीवनी कृषी पर्यटन केंद्र, भोसे जि. सांगली येथे सहल आयोजित केली असून सकाळचा नाष्टा, चहा व दुपारच्या जेवणाची सोय कस्तुरी क्लबतर्फे करण्यात येणार आहे. सकाळी 7 ला सातारा येथून निघून रात्री 7 वा.पर्यंत परत सातारा असे सहलीचे नियोजन करण्यात आले आहे. या सहलीसाठी कस्तुरी सभासदांसाठी 800 रुपये व इतर महिलांसाठी 900 रुपये खर्च आकारण्यात आला आहे. लहान मुले सोबत आल्यास त्यांचा वेगळा खर्च आकारला जाणार आहे. कृषी पर्यटनातील प्रवेश व तिकिटासह सर्व खर्च सहल खर्चामध्ये समाविष्ट असणार आहे. मर्यादित आसन क्षमता असल्याने सदस्यांनी लवकरात लवकर आपली सीट बुक करावी. प्रथम येणार्‍यास प्रथम सीट, अशी बैठक व्यवस्था असल्याने त्वरित सिट बुक करावी. अधिक माहितीसाठी 8104322958 या क्रमांकावर संपर्क साधावा.

कृषी पर्यटनात असा घेतात आनंद…

कृषी पर्यटन केंद्रावरील एकदिवसीय सहलीमध्ये महिलांना रेन डान्स, ट्रॅक्टर सफर, बोटिंग, शिवार फेरी, चिल्ड्रन पार्कसह विविध आऊट डोअर गेम व इनडोअर गेम्सचा आनंद घेता येणार आहे. तसेच सकाळचा नाष्टा, दुपारचे स्वादिष्ट शाकाहारी जेवण देण्यात येणार आहे.

Back to top button