इचलकरंजी : कबनूर येथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; एकाचा मृत्यू

इचलकरंजी : कबनूर येथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; एकाचा मृत्यू

कबनूर : पुढारी वृत्तसेवा : कबनूर येथील महात्मा फुलेनगर मधील अमन फटाका मार्टच्या गोडावूनमध्ये भीषण स्फोट झाला. यामध्ये परवेझ मुजावर (वय 35) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी भेट देवून पंचनामा केला.

कबनूर-कोल्हापूर रोडवर फुलेनगर येथे मुजावर यांचा फटाके तयार करण्याचा कारखाना आहे. नेहमीप्रमाणे मुजावर सकाळी फटाका गोडावूनमध्ये साफसफाईसाठी गेले होते. गोडावूनचे दार उघडून ते आत गेले. दरम्यान त्यांना काही कळण्याच्या आतच स्फोट झाला. त्यांना बाहेर पडण्यासही वेळ मिळाला नाही. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की सगळा परिसर हादरुन गेला. स्फोटाचा आवाज सुमारे दोन किलोमीटर पर्यंत दूर गेला होता. गोडावूनच्या भिंती जमीनदोस्त झाल्या. तर गोडावूनच्या छताचे पत्रे दुरवर उडून गेले होते. परवेझचा स्वभाव मनमिळावू होता. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news