नाशिक : खंबाळेतील विवाहिता खून प्रकरण गुन्हे शाखेकडे | पुढारी

नाशिक : खंबाळेतील विवाहिता खून प्रकरण गुन्हे शाखेकडे

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील खंबाळे शिवारातील शासकीय विश्रामगृहाजवळील खाणीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेचे खून प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.

रविवारी (दि. 21) घडलेल्या या घटनेत तीन ते चार आरोपींचा समावेश असुन एका आरोपीला रविवारीच जमावाने पोलिसांच्या ताब्यात दिले होते, तर दोन ते तीन आरोपी फरार झाले आहेत. या गंभीर घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. या घटने नंतर घोटी पोलिस ठाण्यात हजारो नागरिकांनी घेराव घातला होता. नागरिकांनी घेराव घालत सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांना निलंबित करण्यात यावे अथवा तत्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी केली होती. पोलिस अधीक्षक शहाजी उमाप व अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी जमावाला शांत करत संबंधित गुन्हेगारांना शोधून कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे या घटनेचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडुन केला जाणार आहे.

Back to top button