Kolhapur Maratha Andolan | कोल्हापूर-पुणे एसटी वाहतूक सेवा तात्पुरती थांबवली

Kolhapur Maratha Andolan | कोल्हापूर-पुणे  एसटी वाहतूक सेवा तात्पुरती थांबवली

पुढारी ऑनलाईन डेस्क : जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करणार्‍या मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. परिणामी ठिकठिकाणी जाळपोळ, आंदोलने, निदर्शने सुरु आहेत. काही ठिकाणची सार्वजनिक प्रवासी सेवा स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान, कोल्हापुरातून पुण्याकडे जाणारी एसटी वाहतूक सेवा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. (Kolhapur Maratha Andolan)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात उपोषण करणार्‍या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी (दि.१) लाठीमार केला. यात काही नागरिकांसह पोलिसही जखमी झाले आहेत. आक्रमक आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबाराच्या फैरी झाडल्या. याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. ठिकठिकाणी जाळपोळ, बस फोडण्यात आणि जाळण्यात येत आहेत. खबरदारी म्हणुन सार्वजनिक परिवहन महामंडळाकडुन सार्वजनिक प्रवास सेवा स्थगित करण्यात आली आहे. 

पुण्याहुन जालना, संभाजीनगर, नांदेडला जाणारी बससेवा ठप्प झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशीही काही ठिकाणची बससेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. त्याचबरोबर कोल्हापुरातून पुण्याकडे जाणारी एसटी वाहतुक सेवा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवासी पर्यायी मार्ग म्हणून खासगी बससेवांचा मार्ग निवडावा लागत आहे. (Kolhapur Maratha Andolan)

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news