Kolhapur Gram Panchayat Election | वडणगेत मास्तर गटाची बाजी, गांधीनगरमध्ये सत्तांतर, महाडिक गटाला यश

Kolhapur Gram Panchayat Election | वडणगेत मास्तर गटाची बाजी, गांधीनगरमध्ये सत्तांतर, महाडिक गटाला यश

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा; वडणगे ग्रामपंचायतीत सदाशिव पाटील (मास्तर) गटाच्या संगीता शहाजी पाटील या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. गांधीनगर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून येथे महाडिक गटाचे संदीप हिंदुराव पाटोळे निवडून आले आहेत. येथे बंटी पाटील गटाला धक्का बसला आहे. वडणगे ग्रामपंचायतीमध्ये मास्तर गटाचे १७ पैकी १४ सदस्य निवडून आले असून विरोधी गटाचे केवळ तीन सदस्य निवडून आले आहेत. (Kolhapur Gram Panchayat Election)

करवीरमध्ये 'या' गावांत सत्तांतर

हिरवडे खा. सादळे मादळे, वरणगे, हसूर, सावर्डे दु., सडोली दु., हिरवडे दु., गांधीनगर, वडणगे, कांडगाव.

'या' गावांत सत्ता कायम

कावणे, दिंडनेर्ली, पाडळी बु., सोनाळी

शाहुवाडी तालुका निकाल

बांबवडे, चरण, साळशी, खुटाळवाडी, सरूड, खोतवाडी, वरेवाडी, वारणा कापशी, हारूगडेवाडी, भेडसगांव, कोतोली, रेठरे, विरळे, खेडे, कडवी या गावांत शिवसेना- राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. तर गोगवे, पिशवी, शिवारे ग्रामपंचायती जनसुराज्य -काँग्रेस आघाडीकडे गेल्या आहेत. (Kolhapur Gram Panchayat Election)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news