Kolhapur Gram Panchayat Election Results Live : करवीरमध्ये ‘या’ गावांत सत्तांतर | पुढारी

Kolhapur Gram Panchayat Election Results Live : करवीरमध्ये 'या' गावांत सत्तांतर

Kolhapur Gram Panchayat Election Results Live : कोल्हापूर जिल्ह्यातील 429 गावांचे सत्ताधारी कोण याचा फैसला मंगळवारी (दि. 20) होत आहे. या ग्रामपंचायतीसाठी रविवारी चुरशीने 84.13 टक्के मतदान झाले होते. त्याच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता प्रारंभ झाला आहे. दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येतील, अशी शक्यता आहे.

जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 30 ग्रामपंचायती तर 60 सरपंच बिनविरोध झाले. शाहूवाडी-चनवाड ग्रुप ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. यामुळे 429 ग्रामपंचायतींसाठी आणि 413 सरपंचपदासाठी मतदान झाले. गावच्या वर्चस्वासाठी महिनाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षात टोकाला गेलेल्या ईर्ष्येने अनेक गावांतील निवडणूक चुरशीची झाली. स्थानिक गट, आघाड्याचे प्रमुख असलेल्या नेत्यांची तसेच राजकीय पक्षांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Kolhapur Gram Panchayat Election Results Live Updates :

ईव्हीएम ओपन न झाल्याने तरसंबळे मतमोजणी स्थगित

गुडाळ (पुढारी वृत्तसेवा) : राधानगरी तालुक्यातील तिसऱ्या फेरीत घेण्यात आलेल्या तरसंबळे ग्रामपंचायतीच्या मतमोजणीवेळी प्रभाग क्रमांक तीनमधील एक ईव्हीएम ओपन न झाल्याने या ग्रामपंचायत सरपंचपदाचा निकाल राखीव ठेवला. प्रभाग तीनची मतमोजणी ही स्थगित केली आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकार आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार ईव्हीएम मशीन ओपन करण्याचा तीन वेळा प्रयत्न होऊन मशीन ओपन झाले नाही. त्यामुळे तहसीलदार सौ. मीना निंबाळकर यांनी निवडणूक आयोगाकडे पुढील मार्गदर्शन मागवले आहे.

दरम्यान, दोन प्रभागातील मतदान आणि तिसऱ्या प्रभागातील एक मत ईव्हीएम यातील मतदानावर सरपंचपदाचा निकाल जाहीर करावा अशी मागणी येथील सरपंचपदाच्या एक उमेदवार सौ मनीषा राजाराम सुतार यांनी केली आहे. तरसंबळे येथे रविवारी मतदान सुरू असताना प्रभाग तीन मधील ईव्हीएम 154 मतदान नोंद झाल्यानंतर बंद पडल्याने दुसरे ईव्हीएम लावण्यात आले होते. त्यावर उर्वरीत 154 मतदान नोंद झाले. मात्र मतमोजणी दिवशी हेच बदली ईव्हीएम ओपन झाले नाही. आता या संदर्भात निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे तरसंबळे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे

वडणगेत मास्तर गटाची बाजी

कसबा बावडा : वडणगे ग्रामपंचायतीत सदाशिव पाटील (मास्तर) गटाच्या संगीता शहाजी पाटील या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. गांधीनगर ग्रामपंचायतीमध्ये महाडिक गटाचे संदीप हिंदुराव पाटोळे निवडून आले आहेत. वडणगे ग्रामपंचायतीमध्ये मास्तर गटाचे 17 पैकी 15 सदस्य निवडून आले असून विरोधी गटाचे केवळ दोन सदस्य निवडून आले आहेत.

शाहुवाडी तालुका निकाल

बांबवडे, चरण, साळशी, खुटाळवाडी, सरूड, खोतवाडी, वरेवाडी, वारणा कापशी, हारूगडेवाडी, भेडसगांव, कोतोली, रेठरे, विरळे, खेडे, कडवी या गावांत शिवसेना- राष्ट्रवादीची सत्ता तर गोगवे, पिशवी, शिवारे जनसुराज्य -काँग्रेस आघाडीकडे.

करवीरमध्ये या गावांत सत्तांतर

हिरवडे खा. सादळे मादळे, वरणगे, हसूर, सावर्डे दु., सडोली दु., हिरवडे दु., गांधीनगर, वडणगे, कांडगाव

या गावांत सत्ता कायम

कावणे, दिंडनेर्ली, पाडळी बु., सोनाळी

गांधीनगर : सरपंचपदी संदीप हिंदुराव पाटोळे (महाडिक गट) विजयी, ग्रामपंचायतीत सत्तातंर

हातकणंगले रुकडी ग्रामपंचायत निवडणूक निकाल
खासदार धैर्यशील माने (शिंदे गट शिवसेना )
रुकडी सरपंचपदाचे उमेदवार राजश्री रूकडीकर (माने गट) विजयी
खासदार धैर्यशील माने यांच्या गावात त्यांनी राखला गड
……………
तारळे खुर्द (ता. राधानगरी) – सरपंच, सरिता युवराज पौंडकर (काँग्रेस, राष्ट्रवादी) सतांतर, आकनूर सरपंच- सुषमा गणेश कांबळे (राष्ट्रवादी सता कायम) ९ विरुद्ध१

अनूर (तालुका कागल) येथे काकासाहेब सासवडकर हे संजय घाटगे गटाचे उमेदवार विजयी झाले आहे.

भादोले ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर, जनसुराज्य विजयी

कागल तालुक्यातील चिमगाव सरपंचपदी मुश्रीफ गटाचे दीपक यशवंत अंगज यांचा विजय झाला आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आठ जागा मुश्रीफ गटाच्या विरोधात निवडून आलेल्या आहेत. तर सरपंच मुश्रीफ गटाचे विजयी.

खामकरवाडी- सरपंच कोमल विक्रम हळदे ,केळोशी खुर्द, सरपंच लता दिनकर जाधव, आटेगाव गणपती गोविंदा वागवेकर

मोठ्या गावांमध्ये मुश्रीफ गटाला धक्का बसला आहे.

राधानगरी तालुका ग्रा. पं. सरपंच उमेदवार
राशिवडे/राधानगरी
राधानगरी तालूक्यातील १३ ग्रा.पं.चे विजयी सरपंच पुढीलप्रमाणे
मल्लेवाडी- दिनकर दत्तात्रय खाडे
करंजफेण – जयश्री संतोष वागरे
हसणे – पूजा शरद पाटील
कारीवडे – प्रवीण प्रभाकर पाटील( राजू भाटळे गट)
सुळंबी – सुरेखा प्रदीप गुरव
पिंपळवाडी – महादेव बापू जाधव
घुडेवाडी – मनीषा संभाजी किरुळकर
मुसळवाडी – आशा सुनील महाडिक (महविकास आघाडी)
मांगोली – नेताजी कुंडलिक पाटील (ए वाय पाटील )
कांबळवाडी – अनिता सुरेश कुसाळे (काँग्रेस)
कासारपुतळे – सुनीता शंकर पोवार (मोरे गट)
तळगाव – कृष्णा ज्ञानू पाटील
मजरे कासारवाडा- ए.वाय.गट १० विरुद्ध ०, सरपंचपदी योगीता युवराज वागरे
कपिलेश्वर- सरपंच शहाजी बाजीराव पाटील (स्थानिक आघाडी),
तिटवे- सरपंच अर्चना रंगराव किल्लेदार
शिरसे – सरपंच निकीता प्रवीण कांबळे (राष्ट्रवादी)

हमिदवाडा (तालुका कागल) येथे मंडलिक गटाचे कृष्णात बाबुराव बुरटे हे विजयी झाले आहेत

कागल तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या सेनापती कापशी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मुश्रीफ गटाच्या उज्वला गंगाधर कांबळे या विजयी झाल्‍या आहेत. तेराहून अधिक जागा मुश्रीफ गटाला मिळालेल्‍या आहेत.

कागल तालुक्यातील बेलेवाडी येथे अबोली दशरथ कांबळे सरपंच पदाच्या उमेदवारी विजय झाले आहेत, तर हसूर बुद्रुक येथे या देखील संजय घाटगे गटाच्या शितल लोहार विजयी झाल्‍या आहेत. हणबरवाडी येथे मंडलिक गटाच्या सोनाली कसलकर या विजयी झालेल्‍या आहेत.

कागल तालुक्यातील बोळावी येथे मुश्रीफ गटाचे सागर ज्ञानदेव माने, तर बाळेगाव येथे मुश्रीफ गटाचे शिरसाप्पा गुंडाप्पा खतकले हे सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले आहेत.

ठाणेवाडी येथे श्वेता भरत घोटणे या प्रवीणसिंह पाटील यांच्या गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार विजयी झाल्‍या आहेत.

– जूनेपारगाव – जनसुराज्य बाबासो मोरे १४ X १ सरपंचपदासह विजयी, शहाजी पाटील गट पराभूत

-अंबप- माने गट सरपंचपदासह विजयी- १२ X ३

– आवाडे गट ( शिवाजी पाटील ) पराभूत

-साजणी -आप्पा पाटील कॉंग्रेस ७ X ४ने विजयी

– निलेवाडी _ सुभाष भापकर गट ९-१ ने विजयी, बाबासाहेब पाटील पॅनेल पराभूत

– कागल तालुक्यातील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फेरीमध्ये भाजपने आघाडी घेतली असून मुश्रीफ गटाला धक्का बसला आहे.

– अर्जुनवाडा (तालुका कागल) येथे सुरेखा शहाजी लुगडे ह्या भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर अवचित वाडी येथे वेदिका संभाजी गायकवाड या प्रविणसिंह पाटील गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत.

– अंबपवाडीत सत्ताधाऱ्यांना धक्का

-कागल तालुक्यातील पिराचीवाडी येथे मुश्रीफ गटाच्या सर्वच्या सरपंच पदासह सर्व जागा निवडून आल्या आहेत. कल्पना सुभाष भोसले या सरपंच म्हणून विजयी.

– गडहिंग्लज अपडेट- सरपंचपदाचे विजयी उमेदवार

जखेवाडी : वैशाली गिरी

तारेवाडी : विश्रांती नाईक

शिरपूर तर्फ नेसरी : सचिन गुरव

यमहट्टी : संगिता नामदेव धुमाळे

सांबरे : ज्योती खराडे सरोळी : अस्मिता कांबळे

– चंदगडमध्ये 12 टेबलवर मतमोजणीला प्रारंभ…

– हातकणंगलेमध्ये सुरुवातीला गावनिहाय टपाली मतदान वेगळे करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ९ वाजेपर्यंत एकही निकाल नाही.

गडहिंग्लज तालुका
डोनेवाडी : सिकंदर मुल्ला
हडलगे : हणमंत पाटील
सरपंच विजयी
………………….
काळामवाडी : सरिता लांडे
वैरागवडी : पी.के.पाटील
हीडदुगगी : संतोष कांबळे
बिद्रेवादी : दत्तात्रय गुरव

-नंद्याळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मुश्रीफ- संजय संजय घाटगे- रणजीत पाटील गटाच्या मनीषा सुरेश कांबळे या सरपंचपदाच्या उमेदवार विजयी.

– फरकाटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत मुश्रीफ गटाच्या शितल फराकटे विजयी झाल्या आहेत. दौलतवाडीमध्ये मंडलिक- मुश्रीफ- संजय घाडगे गटाच्या शीतल संदेश जाधव विजयी झाल्या आहेत.

– शिरोळ तालुक्यातील 25 हजार लोकसंख्या असलेल्या अब्दुललाटमध्ये कस्तुरी कुरुंदवाडे लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी

कागलमधील चार ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा

कागल; पुढारी वृत्तसेवा : कागल तालुक्यातील 26 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पहिल्या टप्प्यातील रणदिवेवाडी, बामणी, कसबा सांगाव, निढोरी या चार ग्रामपंचायतींवर भाजपने विजय संपादन केला आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरपंचपदाचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.

हे ही वाचा :

Back to top button