Kolhapur Airport : कोल्हापुरात पहिल्यांदाच उतरले १४६ आसन क्षमतेचे विमान : धावपट्टीच्या दर्जावर शिक्कामोर्तब

Kolhapur Airport
Kolhapur Airport

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर विमानतळावरील (Kolhapur Airport) धावपट्टीचे विस्तारीकरण झाल्यानंतर पहिल्यांदाच १४६ आसन क्षमतेच्या विमानाने मंगळवारी (दि.२२) लँडींग केले. मुंबईतून टेक ऑफ केलेल्या या विमानाचे नव्या अप्रॅनवर पार्किंग करण्यात आले. त्यानंतर दुपारी ३.२० वाजता उतरलेले हे विमान लगेच साडेचारच्या सुमारास मुंबईच्या दिशेने झेपावले.

स्टार उद्योग समुहाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्याकडे असलेल्या कामानिमित्त हे विमान कोल्हापुरात आल्याचे सांगितले जात आहे. एमब्ररर ई १९५-ई २ प्रॉफिट हंटर या प्रकारातील हे विमान असून यामध्ये प्रवाशी नव्हते. एअर बस सारखे विमान कोल्हापूर विमानतळावर (Kolhapur Airport) उतरू लागल्याने येथील धावपट्टीचा दर्जा उत्कृष्ट असल्याचे अधोरेखित झाले आहे.

१३ नोव्हेंबरला तिरूपतीला जाणाऱ्या विमानाने नाईट टेकऑफ केले होते. त्यानंतर आज १४६ आसनांचे एअरबस समकक्ष असणारे विमान उतरले. त्यामुळे विमानतळाची धावपट्टी योग्य, पूरक, सुविधायुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.

– अनिल शिंदे, संचालक, कोल्हापूर विमानतळ

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news