कोल्हापूर : पुराचा सामना करण्यास कोल्हापूर विमानतळ योग्य

कोल्हापूर : पुराचा सामना करण्यास कोल्हापूर विमानतळ योग्य

उजळाईवाडी : पुढारी वृत्तसेवा
पश्‍चिम महाराष्ट्र व कोकण किनारपट्टीभागात पुराचा सामना करण्यासाठी कोल्हापूर विमानतळ अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असल्याचे तटरक्षक दलाचे अधिकारी अमित कोरेगावकर यांनी व्यक्‍त केले. भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी कोल्हापूर विमानतळावर विमानतळ संचालक कमल कुमार कटारिया यांची बुधवारी भेट घेऊन मान्सूनपूर्व नियोजनासंदर्भात चर्चा केली.

पश्‍चिम विभागातील भारतीय तटरक्षक दल आगामी मान्सूनच्या तयारीसाठी सज्ज आहे. शोध आणि बचाव कार्याची पोहोच वाढवण्यासाठी, पश्‍चिम किनार्‍यावरील विविध हवाई क्षेत्रांशी उडान योजनेअंतर्गत समन्वय साधणे, जिल्ह्यातील सुविधांचे समन्वय आणि मूल्यांकन करण्यासाठी कोस्ट गार्ड टीम ने डॉर्नियर द्वारे कोल्हापूरला विमानतळास बुधवारी दुपारी 1वाजता भेट दिली.
याअंतर्गत विमानतळ संचालक कमल कुमार कटारिया भारतीय विमानतळ प्राधिकरण, कोल्हापूर विमानतळ टीम आणि भारतीय तटरक्षक दल एअर स्टेशन दमणचे अधिकारी अमित कोरेगावकर यांच्यासमवेत बैठक झाली. यामध्ये सर्व सेवासुविधा म्हणजे, रनवे, टॅक्सीवे, इंधन भरण्याची सुविधा आणि इतर सेवा आगामी पावसाळ्याला तोंड देण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर उपलब्ध असल्याचे दिसून आले.

पालकमंत्री ना. सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित होत असलेल्या कोल्हापूर विमानतळावर उपलब्ध सेवांबाबत भारतीय तटरक्षक दल समाधान व्यक्‍त केले कोल्हापूर विमानतळ आगामी पावसाळ्यात कोणतीही कठीण परिस्थिती हाताळण्यास पूर्णपणे सक्षम असल्याने अधिकार्‍यांनी समाधान व्यक्‍त केले. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास तटरक्षक दलाचे जवान रक्षक विमानाने रवाना झाले.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news