Virat Anushka Reaction : केएल राहुलचा विराटनं घेतला कॅच अन् अनुष्कानं मारल्या उड्या, रिॲक्शनचा व्हिडिओ व्हायरल

Virat Anushka Reaction : केएल राहुलचा विराटनं घेतला कॅच अन् अनुष्कानं मारल्या उड्या, रिॲक्शनचा व्हिडिओ व्हायरल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनौ सुपरजायंट्सने सर्वोच्च धावसंख्येच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. आरसीबीने पहिल्यांदा २१२ धावा करूनही लखनौने हे आव्हान शेवटच्या चेंडूवर पूर्ण करून रोमहर्षक सामना आपल्या नावावर केला. रन मशिन, रेकॉर्ड मशिन, निडर फलंदाज विराट कोहलीने आयपीएलच्या १६ व्या हंगामातील दुसरे अर्धशतक ठोकले. सामन्यानंतर कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केएल राहुलचा कॅच घेतल्यानंतर कोहली आणि अनुष्काच्या रिॲक्शनचा हा व्हिडिओ आहे.

बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सोमवारचा दिवस वादळी ठरला. सुपरजायंटस् आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या आयपीएल सामन्यात तब्बल ४२५ धावांचा पाऊस पडला. आरसीबीचे २१२ धावांचे आव्हान लखनौने पूर्ण करून विजय मिळवला. मार्कस स्टॉयनिस (३० चेंडूंत ६५ धावा) आणि निकोलस पूरन (१९ चेंडूंत ६२ धावा) यांच्या खेळीपुढे आरसीबीच्या २१२ धावांचे डोंगराएवढे मोठे आव्हान लखनौला यशस्वीपणे करता आले. कर्णधार लोकेश राहुल २० चेंडूत १८ धावा करून बाद झाला. १२ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजने त्याला डगआऊटमध्ये पाठवले, विराटने त्याचा झेल घेतला. झेल घेतल्यानंतर विराटने जल्लोष केला. त्याच्या या रिअॅक्शनचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा देखील हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होती. राहुलच्या विकेटनंतरचा तिच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ देखील इंटरनेटवर फिरत आहे. विराटला कॅच घेताना पाहून अनुष्का तिच्या जागेवर उभी राहिली आणि टाळ्या वाजवू लागली.

विराटने या सामन्यात आयपीएलच्या १६ व्या हंगामातील दुसरे अर्धशतक ठोकले. विराटने मुंबईविरुद्ध ३८ चेंडूंत पहिले अर्धशतक झळकावले होते. सोमवारी त्याने लखनौ विरुद्ध ३५ चेंडूंत अर्धशतक ठोकले. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ४४ चेंडूंत ६१ धावा केल्या. चार चौकार आणि चार षटकारांच्या या खेळीने सर्वांना मंत्रमुग्ध केले, पण मोठा फटका मारताना तो झेलबाद झाला. अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राने त्याला बाद केले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news