NCP : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा रद्द; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय | पुढारी

NCP : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा रद्द; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा रद्दचा निर्णय आज (दि. १०) दिला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत घेतलेल्या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी काळातील राजकारण आणि निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी (दि. १०) तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला, तर आम आदमी पार्टीला केंद्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. पीटीआयने दिलेल्या अहवालामधून ही माहिती प्राप्त झाली. राष्ट्रीय पक्षासाठी आवश्यक असणारे संख्याबळ NCP, CPI, TMC या तीन पक्षांकडे नसल्याने आयोगाने आज (दि. १०) हा दर्जा काढून घेतला आहे. .

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १९९९ साली झाली. तेव्हापासून हा पक्ष राज्याच्या राजकारणामध्ये सक्रीय होता. तसेच या पक्षाने देशाच्या राजकारणातही ठसा उमटवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकेकाळी देशाचे केंद्रीय कृषीमंत्रीदेखील होते. १० जानेवारी २००० रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा कायम होता. पण २०१४ निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्षासंदर्भात त्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय आणि नागालँड याठिकाणचे राष्ट्रवादीचे अस्तित्व कमी झालेले आहे.

हेही वाचा

Back to top button