Jagpathi Babu : साऊथमधील ‘या’ अभिनेत्याने का सोडला अजय देवगनचा चित्रपट?

jagpathy babu
jagpathy babu
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगपती बाबू (Jagpathi Babu) हे साऊथ चित्रपट इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी एकापेक्षा एक चित्रपटात नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका पार पाडल्या आहेत. सुमारे ३० वर्षे त्यांनी या चित्रपट इंडस्ट्रीत आपले बस्तान बसवले आहे. तुम्हाला माहितीये का, तान्हाजी या बॉलिवूड चित्रपटामध्येदेखील जगपती बाबू (Jagpathi Babu) हे दिसणार होते. मग, असं काय घडलं की, जगपती यांना हा चित्रपट सोडावा लागला?

jagpathi babu
jagpathi babu

अजय देवगनसोबत तान्हाजी या चित्रपटामध्ये जगपती बाबू हे काम करणार होते. पण, नंतर त्यांना रिजेक्ट करण्यात आलं होतं. हा बॉलिवूडचा सर्वात हिट चित्रपटांपैकी एक ठरला.

jagpathi babu
jagpathi babu

अजय देवगननं दिली हाेती महत्त्वाच्या भूमिकेची ऑफर!

अजय देवगन स्टारर तान्हाजी चित्रपटासाठी जगपती यांना ॲप्रोच करण्यात आलं होतं. या चित्रपटामध्‍ये त्यांना खूप महत्त्वाची भूमिका ऑफर करण्य़ात आली होती. पण, त्यावेळी जगपती यांच्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे अजय देवगनसोबत ते तान्हाजी चित्रपटामध्ये दिसले नाहीत. जगपती हे अजय देवगनसोबत बॉलिवूडमध्ये आले असते तर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या साऊथ स्टार्सच्या यादीत जगपती यांच्या नावाचा समावेश झाला असता.

jagpathi babu
jagpathi babu

जग्गूदादा नावाने ओळख

साऊथ चित्रपटामध्ये 'जग्गू दादा' नावाने जगपती यांना ओळखले जाते. आपल्या दमदार ॲक्टिंगने फॅन्सना त्यांनी आपल्या अभिनयाची भूऱळ घातलीय. जगपती यांनी कन्नड, तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. एकापेक्षा एक चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं आहे. आतापर्यंत त्यांनी १२० हून अधिक चित्रपटात काम केलं आहे.

jagpathi babu
jagpathi babu

असं आहे खरं नाव

अभिनेते जगपती यांचे पूर्ण नाव – वीरामचनेनी जगपति चौधरी असं आहे. ते प्रसिध्द दिग्दर्शक व्ही. बी. राजेंद्र प्रसाद यांचा मुलगा आहेत. १९८९ मध्ये त्यांनी तेलुगु चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. चित्रपट सिम्हा स्वप्न मध्ये ते पहिल्यांदा दिसले होते. या चित्रपटाची निर्मिती त्यांच्या वडिलांनी केली होती. तर चित्रपटाचे दिग्दर्शन मधुसूदन राव यांनी केले होते.

jagpathi babu
jagpathi babu

साऊथ अभिनेते जगपती यांनी आपल्या शानदार करिअरमध्ये चार वेळा फिल्मफेअर ॲवॉर्डवर आपलं नाव काेरलं आहे. इतकचं नाही तर त्यांना साऊथचा सर्वात प्रसिद्ध  'नंदी ॲवॉर्ड'नेदेखील त्‍यांना गौरवण्यात आलं आहे.  येत्या काळात ते अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news