Dry Shampoo : ड्राय शॅम्पू म्‍हणजे काय? ‘युनिलिव्हर’ने बाजारातून का परत मागवली उत्पादने?

Dry Shampoo : ड्राय शॅम्पू म्‍हणजे काय? ‘युनिलिव्हर’ने बाजारातून का परत मागवली उत्पादने?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : युनिलिव्हरने अमेरिकी बाजारातून डव्ह हे एरोसोल ड्राय शॅम्पूची ( Dry Shampoo ) उत्‍पादने परत मागवली आहेत. ड्राय शॅम्पू म्‍हणजे काय? युनिलिव्हरने बाजारातून उत्पादने परत का मागवली?, याविषयी जाणून घेवूया.

बेंझिन हे मानवी शरिरासाठी घातक ठरणारा घटक आहे. बेंझिन नाक, तोंड आणि त्वचेच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतात.Dove या जगप्रसिद्ध ड्राय शॅम्पूमध्ये बेंझिनसारखा घटकामुळे रक्‍ताचा कर्करोगाला आमंत्रण देणारा घटक असल्‍याचे अमेरिकेतील आरोग्‍य विभागाने स्‍पष्‍ट केले आहे. यामुळे युनिलिव्हरने Dove, Nexxus, Suave, TIGI (Rokaholic and Bed Head) आणि Tresemmé dry shampoo aerosols यांचा Dove शाम्पूबरोबरच अनेक उत्पादने बाजारातून मागे घेतली आहेत. ही उत्‍पादने ऑक्टोबर 2021 पूर्वी उत्पादित केलेली आहेत.

ड्राय शॅम्पू म्‍हणजे काय?

केस न धुता स्‍वच्‍छ करण्‍यासाठी तसेच डोक्‍यावरील तेल शोषून घेण्‍यासाठी ड्राय शॅम्पूचा वापर होतो. प्रवास असो की जीममधील वर्कआउट नंतर कोरड्या केसांना सेट करण्‍यासाठीही याचा वापर केला जातो. सामान्‍यत: शॅम्‍पू हे ओल्‍या केसांवर वापरला जातो. मात्र ड्राय शॅम्‍पू हा कोरड्या केसांना लावण्‍यात येणारे उत्‍पादन आहे. त्‍यामुळे हे उत्‍पादन सर्वसामान्‍य शॅम्‍पू, कंडिशनर आणि अन्‍य केस संवर्धन उत्‍पादनासारखे नाही.

Dry Shampoo : युनिलिव्‍हरने उत्‍पादन का मागे घेतले?

यासंदर्भात १८ ऑक्‍टोबर रोजी युनिलिव्‍हर कंपनीने खुलासा केला की, "बेंझिनचा शरीरावर विपरीत परिणाम होत असल्‍याचे निदर्शन आले आहे. यामुळे विविध ब्रँडमधील अनेक ड्राय शैम्पू परत मागवले आहेत. आम्‍ही स्वतः केलेल्‍या तपासणीतून, कंपनीला 19 ड्राय शैम्पूमध्ये बेंझिनचे अंश सापडले. मात्र या बेंझिनची पातळी ग्राहकांवर घातक परिणाम करण्‍याइतकी
तीव्र नव्‍हती. तसेच ग्राहकांनाही ड्राय शॅम्‍पसूचा प्रतिकूल परिणाम झाल्‍याच्‍या तक्रारी आलेल्‍या नाहीत."

बेंझिन म्‍हणजे काय ?

बेंझिन हे एक रसायन आहे. हा ज्वलनशील पदार्थ आहे. तसेच त्‍याचे खूप लवकर बाष्पीभवन होते. त्याची वाफ हवेपेक्षा जड असते. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार बेंझिन पाण्यात अल्‍पप्रमाणात विरघळते आणि पाण्याच्या वर तरंगते. अमेरिकेत वापरल्‍या जाणार्‍या प्रमुख २० रसायनांपैकी बेंझिन एक आहे. प्लास्टिक, रेझिन्स, नायलॉन आणि सिंथेटिक फायबर बनवण्यासाठी कंपन्या बेंझिनचा वापर करतात.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news