Weight Loss Spices : स्वयंपाक घरातील ‘हे’ जादूई मसाले!

बडीशेप
बडीशेप

पुढारी ऑनलाईन डेस्क : वाढलेलं वजन कमी करणे, हे सर्वात मोठे आव्हान आहे. महिलांचे तर दिवसेंदिवस वजन वाढतानाच दिसते. कुणी जिमला जातं तर कुणी डाएट करतं. काही जण चालायला जातात. हे उपाय जरी नक्की उपयोगात येत असले तरी आपण आपल्या खाण्या-पिण्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. अनेकदा उपवास करून आपले वजन वाढते. तर कधी चुकीच्या पद्धतीने व्यायाम किंवा खाण्याकडे लक्ष न दिल्यानेही वजन वाढू लागते. कधी कधी महागडी औषधे वापरली जातात. त्या औषदांचा उपयोग होईलचं असे नाही. (Weight Loss Spices) परिणामी, नुकसानीला सामोरे जावे लागते. तुम्हाला माहितीये का, आपल्या स्वयंपाक घरातील जादुई मसाले वापरून आपण आपले वजन कमी करू शकतो. (Weight Loss Spices)

जिऱ्याचे पाणी

प्रत्येक स्वयंपाक घरात जिऱ्याचा वापर केला जातो. पदार्थाला फोडणी देण्यासाठी एक चमचा का होईना जिरे टाकले जातात. तुम्हाला माहितीये का, जिऱ्याचे पाणी आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे. जिऱ्याचे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास साधे पाणी एका भांड्यात उकळा. उकळलेल्या पाण्यात १ छोटा चमचा जिरे टाका. आता पाण्याचा रंग पिवळसर होऊपर्यंत थांबा. एका ग्लासमध्ये हे पाणी झाकून ठेवा. रात्रभर जिरे पाण्यात भिजू द्या. सकाळी उठल्यानंतर पाणी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या. या पाण्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई जीवनसत्त्वे असतात.

बडीशेप

मुखवास म्हणून आपण बडीशेपचा वापर करतो. जड पदार्थ खाल्यानंतर चिमुटभर का होईना, बडीशप तोंडात टाकतो. आता हीच बडिशेप गरम पाण्यात रात्रीच्या वेळी भिजवायची आहे. एक ग्लास गरम पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा साधी बडीशेप टाका. रात्रभर पाणी तसेच राहू द्या. सकाळी उठून हे पाणी प्या. बडीशेपने रोगप्रतिकार शक्ती वाढते. पचनक्रिया सुधारते. पोट साफ होण्यास मदत होते.

ओव्याचे पाणी

ओव्याला अजवाईन असे देखील म्हटले जाते. अर्धा चमचा किंवा एक चमचा (सोयीनुसार) ओवा घेऊन ते रात्रभर भिजू द्या. ते पाणी तुम्ही सकाळी उठल्यानंतर प्याव. ओव्याने पोट साफ होते. भूक चांगली लागते. ओवा पचन सुधारते.

धने पाणी

धने किंवा एक चमचे धनपूड रात्री एक कप गरम पाण्यात भिजत घाला. सकाळी पाणी गाळून प्या. यामुळे तुमचे केस दाट आणि मजबूत होण्यासाठी मदत होईल. धनेमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामध्ये व्हिटॅमिन के, सी आणि ए जीवनसत्व असतात.

weight loss
weight loss

हे मसाले वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मदत करू शकतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news