Curd : दहीसोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ ५ पदार्थ

दही
दही

पुढारी ऑनलाईन डेस्क : शरीराला गारवा देणारा पदार्थ म्हणजे दही. दह्याचा वापर आपल्या जेवणात सर्रास होतो. वजन कमी करण्यासाठी तर दही खा असा सल्ला दिला जातो. दही जेवणाची चव वाढवते. अनेक पदार्थांमध्ये दही (Curd) वापरले जाते. सॅलड, ताक, लस्सी, कढी आणि बिर्याणीमध्येही याचा वापर होतो. पण तुम्हाला माहितीये का, असे काही पदार्थ आहेत, जे दह्यासोबत कधीच खाऊ नयेत. (Curd)

मासे आणि दही

जर तुम्ही मासे खाल्ले असतील तर त्यावेळी दही खाऊ नका. दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोट दुखणे, अपचन यासारखी समस्या उद्भवू शकते.

दूध आणि दही

दूध आणि दही दोन्ही पदार्थ एकत्र खाऊ नयेत. असे केल्याने ॲसिडिटी, गॅस आणि उलट्या होऊ शकतात. तसेच डायजेशनची समस्यादेखील होऊ शकते.

उडीद डाळ आणि दहीजर उडीद डाळीपासून बनवलेले पदार्थ खात असाल तर त्यावेळी दह्याचे सेवन करू नये. असे यासाठी की, दोन्ही पदार्थ एकत्र खाण्याने तुमची प्रकृती बिघडू शकते. लूज मोशन होणे, सूज आणि गॅसची समस्या होऊ शकते.

दही आणि आंबा

कधी कधी लोक दही आणि आंबा खातात. पण असे केल्याने त्वचेची अॅलर्जी होऊ शकते.

तेलकट, तळलेले पदार्थ

चिप्स, तळलेले पदार्थ, तेलकट अनेन, पराठे, भटुरे, पुरी यासारख्या पदार्थासोबत अन्न खाऊ नये. यामुळे पचनाचा त्रास होऊ शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news