पुढारी ऑनलाईन डेस्क : कवी आणि अभिनेते किशोर कदम यांनी मुंबई-पुणे हायवेवरील टोलवसुलीबीबत परखड मत मांडले आहे. किशोर कदम यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली असून ती चर्चेत आली आहे. त्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे संदर्भात ही पोस्ट केली आहे. तसेच स्पष्ट शब्दात टोलवसुली लूटीबाबत मत व्यक्त केले आहे.
मुंबईहून पुण्याला जाताना एक्सप्रेस हायवे वर २४० टोल घेतात. मध्ये मन:शांती वगैरे मध्ये काही कायला लोणावळ्यात उतरलं की वर हायवेवर पुन्हा आल्यावर पुन्हा २४० का घेतात? टोलच्या नावाखाली चाललेली लोकांची ही लूट थांबवण्याबद्दल कुणी बोललं का? आणि एरव्ही प्रवास केल्यावर अधून मधून फास्टटॅग मधून पैसे गेल्याचे मेसेजेस तासा दोन तासांनी येत राहतात ते पैसे कुठे आणि का जातात? अरे लूट थांबवा रे ही .. लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात? कुणाकडे तक्रार करायची? याला जबाबदार अधिकारी कोण आहेत?