पुढारी ऑनलाईन डेस्क: बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते बीग बी अमिताभ बच्चन आणि किंग खान शाहरुख खान यांचे चित्रपट पाहणे त्यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. या दोन सुपरस्टार्सनी बॉलीवूडवर अधिराज्य गाजवत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या दोघांना पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करताना पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. चाहत्यांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. (Big B- King Khan)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. तब्बल 17 वर्षांनी हे दोघे सोबत येऊन काहीतरी अफलातून मनोरंजक प्रोजेक्ट करणार आहेत. याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मनोरंजन क्षेत्रासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. आता हे दोघे कोणत्या चित्रपटातून एकत्र येणार ? याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिले आहे. (Big B- King Khan)
यापूर्वी या दोघांनी मोहब्बतें, कभी खुशी कभी गम आणि कभी अलविदा ना कहना यांसारख्या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांना मोहित केले आहे. आता पुन्हा एकदा सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी ते दोघे सज्ज झाले आहेत.
हेही वाचा