साऊथ कोरिया ऑटो मेकर कंपनी 'किया मोटर' (Kia Motor)ने आज भारतीय बाजारामध्ये आपली सर्वात स्वस्त एसयूव्ही किआ सोनेट ॲनिवर्सरी एडिशन एसयूवी (Kia Sonet Anniversary Edition SUV) च्या नव्या ॲनिवर्सरी एडिशनला लॉन्च केले. किया मोटर (Kia Motor) ला भारतीय बाजारात प्रदार्पण करून एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर किया मोटरने ही नवी कार बाजारात आणली आहे.
कियाची ( Kia SUV ) ही नवी ॲनिवर्सरी एडिशन एसयूव्हीच्या मिड स्पेक्स HTX व्हेवेरिएंटवर आधारित आहे. किया मोटर (Kia Motor) ने ॲनिवर्सरी एडिशन एसयूव्ही अनेक वैशिष्ट्यांसह लॉन्च केले आहे. कंपनीला आशा आहे की, भारतीय बाजारात कारच्या नव्या एडिशनला उत्तम प्रतिसाद मिळेल.
किआ सोनेट ॲनिवर्सरी एडिशन एसयूव्ही तिच्या आकर्षक लुक आणि दमदार इंजन क्षमतेमुळे ग्राहकांचे लक्ष वेढून घेत आहे. या नव्या एसयुव्हीची किंमत 10.79 लाख रुपयांपासून 11.89 लाख रुपयांदरम्यान असल्याचे समजते आहे. Kia Sonet चे नवे स्पेशल एडिशन पेट्रोल-डिझेल आणि मॅनुअल-ऑटोमेटिक गियरबॉक्ससह असे उपलब्ध आहे. रेगुलर मॉडेलच्या तुलनेत नव्या एडिशनमध्ये कंपनीने काही खास नव्या फीचर्ससा समावेश केला आहे.
कंपनीने या SUV मध्ये काही कॉस्मेटिक बदल केले आहेत. ज्यात पुढील आणि मागील बाजूस स्किड प्लेट्स देण्यात आल्या आहेत. दरवाजे आणि व्हील सेंटर कॅपसह, बंपरवर टेंजरिन अॅक्सेंट देण्यात आले आहेत. भारतातील एक वर्षपूर्ती निमित्त नवीन डिझाइनचे ग्रिल आणि प्रतिक चिन्ह म्हणून एक बॅज मिळाला आहे.
कंपनीने सोनेट अॅनिव्हर्सरी एडिशन दोन इंजिन पर्यायांसह सादर केले आहे. 1.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन. पेट्रोल इंजिन 120hp पॉवर आणि 172Nm टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर 1.5 लीटर डिझेल इंजिन 100hp पॉवर आणि 240Nm टॉर्क जनरेट करते. टर्बो पेट्रोल इंजिन 6 स्पीड iMT आणि 7 स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. त्याच वेळी, डिझेल इंजिन 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर स्वयंचलित गिअरबॉक्ससह येते.
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात ऑटो एलईडी हेडलॅम्प, सिंगल पॅन सनरूफ, कीलेस एंट्री, रिमोट इंजिन स्टार्ट, 8.0 टचस्क्रीन इन्फोटेनमेंट देण्यात आले आहे, जे अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोला जोडता येते. इतर वैशिष्ट्यांमध्ये ड्रायव्हिंग मोड, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल इत्यादी देण्यात आले आहे. तर टॉप स्पेक्सच्या तुलनेत यात बोस साउंड सिस्टम, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि एअर प्युरिफायरही देण्यात आले आहे.
सेफ्टी फिचर्सबद्दल सांगयचे झाल्यास कियाच्या नव्या एडिशनमध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD), पार्किंग सेन्सर, कॅमेरा, हिल स्टार्ट असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल, ड्युअल एअरबॅग इत्यादींसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) देण्यात आले आहे.