Khushi Kapoor : खुशीने जान्हवीलाही टाकले मागे, ब्लॅक कटआऊट ड्रेसमध्ये घायाळ करणाऱ्या अदा

khushi kapoor
khushi kapoor
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूरने आपले बॉलिवूडमध्ये बस्तान बसवले आहे. आता तिची बहिण खुशी कपूर (Khushi Kapoor) इन्स्टाग्रामवर खूप ॲक्टिव्ह राहते. खुशी कपूर नेहमी सोशल मीडियावर आपले फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत राहते. सोशल मीडिया युजर्स नेहमीच या फोटोंना लाईक करतात. आता खुशीने (Khushi Kapoor) लेटेस्ट फोटोशूट केले आहे. हे फोटो व्हायरल होताच अनेक जण म्हणताहेत की, खुशीचं कपडे पाहिल्यानंतर उर्फी जावेदची आठवण झाली. सेलेब्सकडून तिला कमेंट्स मिळत आहेत. दुसरीकडे उर्फी जावेदशी तिची तुलना होऊ लागलीय.

खुशीने पोस्टमध्ये काय म्हटलंय-

खुशी कपूर इन्स्टावर ॲक्टिव्ह राहते. ती नेहमी आपले फोटोज, व्हिडिओज शेअर करत राहते. आता खुशीने ब्लॅक स्किन हग कट आऊट ड्रेसमध्ये आपला एक फोटो शेअर केला आहे. या ड्रेसमध्ये ती खूप सिजलिंग दिसतेय. काही तासातच खुशी कपूरचे फोटोशूट व्हायरल झाले. दीपिका पादुकोण, करिश्मा कपूर, जान्हवी कपूर, आलिया कश्यप आणि सुहाना खाननेदेखील कमेंट करत खुशीचे कौतुक केले आहे.

चित्रपटात पदार्पणासाठी तयार…

खुशी कपूर बॉलीवूड डेब्यूसाठी तयार आहे. खुशी, जोया अख्तरचा आगामी चित्रपट द आर्चीजमधून डेब्यू करणार आहे. या चित्रपटातून शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचाही डेब्यू असणार आहे. अगस्त्य नंदादेखील या चित्रपटातून पदार्पण केले आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि टीजर काही काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. पण, नेपोटिझमवरून या स्टारकिड्सवर टीकाही झाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news