Khushbu Sundar : ‘वडिलांनीच माझे लैगिंक शोषण केले‘

Khushbu Sundar : ‘वडिलांनीच माझे लैगिंक शोषण केले‘

हैदराबाद; पुढारी ऑनलाईन : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जगभरासह देशात शक्तीचा जागर होत आहे. तमाम स्त्रियांना शुभेच्छा दिल्या जात आहेत, आदर आणि कौतुक केले जात आहे. सर्वत्र सन्मान साहेळे होत आहेत. या सर्वांमध्ये भाजपच्या महिला नेता आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य आणि तामिळ अभिनेत्री यांनी जयपूर येथील कार्यक्रमात 'आपल्या स्वत:च्या वडिलांनी माझे लैगिंक शोषण केले असे विधान केले होते. या विधानानंतर एकच गदारोळ उठला. आता त्या महिला नेत्याने पुन्हा पुढे येत आपण आपल्या विधानावर ठाम असून हे वक्तव्य केल्याने मला अजिबात खंत वाटत नसल्याचे त्या भाजप नेत्याने म्हटले आहे. (Khushbu Sundar)

तामिळ चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तथा भाजपच्या महिला नेत्या आणि सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य म्हणून कार्यरत असणाऱ्या खुशबू संदुर यांनी स्वत:वरच झालेल्या अन्यायाचा खुलाचा केला आहे. यावर बोलताना खुशबू सुंदर म्हणाल्या,'मला वाटते की फक्त चर्चेत येण्याठी मी उथळ अथवा आश्चर्यकारक विधान केलेले नाही. मी प्रामाणिकपणे बाहेर पडत या गोष्टीचा सर्वांसमोर खुलासा केला आहे. मला या बद्दल खेद अथवा लाज वाटत नाही. उलट अपराध्यालाच याबाबतची लाज वाटली पाहिजे'. (Khushbu Sundar)

एएनआयशी बोलताना अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सांगितले की, त्यांच्या या खुलाशामुळे महिलांनी त्यांच्यासोबत जे काही घडले त्याबद्दल बोलावे, अशी त्यांची इच्छा आहे. त्या पुढे म्हणाल्या की, मला वाटते की मला हा संदेश देणे आवश्यक आहे. तुम्ही मजबूत व्हा आणि स्वतःवर नियंत्रण ठेवा. महिलांनी याबद्दल बोलणे आवश्यक आहे आणि त्यांना हे सांगणे आवश्यक आहे की हे माझ्यासोबत घडले आहे आणि काहीही झाले तरी मी माझा पुढील प्रवास सुरू ठेवेन. (Khushbu Sundar)

खुशबू सुंदर यांनी अलीकडेच जयपूरमध्ये 'मोजो स्टोरी'ने आयोजित केलेल्या 'वुई द वुमन' या कार्यक्रमात सांगितले की, त्या १५ वर्षांच्या असताना त्यांनी वडिलांविरोधात बंड करायला सुरुवात केली. यानंतर वडिलांनी कुटुंबाला निराधार सोडले. त्या म्हणाल्या, "एक अशी वाईट गोष्ट ज्याने मला बऱ्याच काळापर्यत त्रास दिला, ज्याला मी कधीच विसरू शकत नाही व माफ सुद्ध करु शकत नाही, पण त्या गोष्टीला मागे सोडून मी पुढे आहे आहे. ती गोष्ट म्हणजे लहानपणी माझ्या वडिलांनी माझे केलेले लैंगिक शोषण. जेव्हा एखाद्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार होतो तेव्हा तिला आयुष्यभर त्रास होतो."

खुशबू सुंदर म्हणाल्या, मी माझ्या वडिलांच्या विरोधात उभी राहिली याचा मला अभिमान आहे कारण "जर ते कुटुंबात राहिले असते तर मी इथपर्यंत पोहोचले नसते."जर मी घरातील पुरुषाशी लढू शकते तर मी जगाचा सामना सहजपणे करु शकते."


अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news