दिल्ली सेवा विधेयकाला विरोध केल्याबद्दल केजरीवाल यांनी मानले काँग्रेसचे आभार

दिल्ली सेवा विधेयकाला विरोध केल्याबद्दल केजरीवाल यांनी मानले काँग्रेसचे आभार
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली संदर्भातील विधेयकाला संसदेत विरोध केल्याबद्दल आप नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसचे आभार मानले आहेत. संसदेच्या दोन्ही सदनात काँग्रेसने या विधेयकाविरोधात भूमिका घेत आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला होता. केजरीवाल यांनी आभाराचे पत्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे अध्यक्ष मलि्लकार्जुन खर्गे तसेच राहुल गांधी यांना पाठविले आहे.

दिल्लीच्या लोकांचा घटनात्मक अधिकार वाचविण्यासाठी संसदेच्या बाहेर आणि संसदेत व्यापक प्रयत्न करण्यात आले. संविधान वाचविण्यासाठी तुम्ही जी वचनबध्दता दाखविली, ती आम्ही दशकांपर्यंत लक्षात ठेवू. संविधान कमजोर करणाऱ्यांविरोधात सुरु असलेल्या लढाईत आम्ही आपणास पाठिंबा देत राहू, असेही केजरीवाल यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news