संसदेबाहेर जाताना राहुल गांधींनी केले फ्लाइंग किस : स्मृती इराणींचा गंभीर आरोप | पुढारी

संसदेबाहेर जाताना राहुल गांधींनी केले फ्लाइंग किस : स्मृती इराणींचा गंभीर आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेतील भाषण संपवून संसदेबाहेर जाताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महिला खासदारांकडे पाहतफ्लाइंग किस करून हावभाव केले, त्यांनी महिला सदस्यांचा अपमान केला आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज (दि.९) केला. मणिपूर हिंसाचारावरून विरोधकांनी मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चा मंगळवारपासून लोकसभेत सुरू झाली आहे. आज या विषयांवरून स्मृती इराणी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. (No-confidence motion in Lok Sabha)

मणिपूर विषयावरील चर्चेपासून विरोधक पळून गेले

स्मृती इराणी म्हणाल्या की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत माताची हत्या केल्याच्या विधानावर विरोधकांकडून टाळ्या वाजवल्या जात आहेत. काँग्रेसला भारताचे विभाजन करायचे आहे का ?, असा सवाल करून आज सिद्ध झाले आहे की, कोणाच्या मनात गद्दारी आहे. मणिपूर विषयावरील चर्चेपासून विरोधक पळून गेले. मणिपूर आपल्या देशाचे अभिन्न अंग आहे, असे इराणी म्हणाल्या.

काश्मीरमधील वास्तवाला काँग्रेसने अजेंडा म्हटले आहे. काश्मीरवासियांचा आवाज भारताचा आवाज नाही का ? असा सवाल करून काश्मीरमध्ये मोदी सरकारने कलम ३७० हटविले आहे. त्यापासून काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली आहे, असेही इराणी यांनी सांगितले. काँग्रेसने शीखांची हत्या केली आहे, असा दावा करून काँग्रेस नेत्याला कोळसा घोटळ्यात शिक्षा झाली आहे. भीलवाडामध्ये १४ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. या घटनेवर विरोधक गप्प का आहेत. महिलावरील बलात्काराच्या घटनेवर विरोधक हसतात, अशी टीकाही इराणी यांनी यावेळी केली.

तुम्ही भारत नाही. कारण भारत भ्रष्ट नाही. भारत घराणेशाहीवर नव्हे, तर गुणवत्तेवर विश्वास ठेवतो. आणि आज तुमच्यासारख्या लोकांनी ब्रिटिशांना काय सांगितले होते ते लक्षात ठेवण्याची गरज आहे. भारत छोडो, भारत छोडो, आता भ्रष्टाचार, घराणेशाही सोडा, कारण गुणवत्तेला आता भारतात स्थान मिळाले आहे, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

हेही वाचा 

Back to top button