Karnataka News | कर्नाटकातील काँग्रेस मंत्रिमंडळात १० ते १२ मंत्री?, संभाव्य यादी आली समोर

Karnataka News | कर्नाटकातील काँग्रेस मंत्रिमंडळात १० ते १२ मंत्री?, संभाव्य यादी आली समोर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : काँग्रेसने (Congress) गुरुवारी अधिकृतपणे मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नावांची घोषणा केली. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून सुरु असलेला सस्पेन्स काल संपला. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री बनणार आहेत. दरम्यान, शनिवारी २० मे रोजी दुपारी १२.३० वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी काँग्रेसचे किमान १० ते १२ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त The Times of India ने दिले आहे. (Karnataka News)

माजी मुख्यमंत्री असलेला सिद्धरामय्या नऊ वेळा आमदार राहिले आहेत. तर आठ वेळा आमदार राहिलेले शिवकुमार पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. कांतीरवा स्टेडियमवर शपथविधी होणार आहे.

काँग्रस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. जी परमेश्वर, एचके पाटील, केएच मुनियप्पा, आरव्ही देशपांडे, एम. बी. पाटील, लक्ष्मी हेब्बाळकर आणि तन्वीर सैत यांनी त्याला अनुमोदन दिले.

या दोघांनी डझनभर काँग्रेस आमदारांसह राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. याआधी माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी राजभवनात जाऊन काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून राज्यपालांची भेट घेतली होती. काँग्रेसच्या सूत्रांनी म्हटले आहे की सिद्धरामय्या आणि शिवकुमार प्रत्येकी ३० महिन्यांसाठी मुख्यमंत्रीपद वाटून घेतील. शिवाय पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत शिवकुमार कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील.

काँग्रेसने शपथविधी सोह‍ळ्यासाठी समविचारी विरोधी पक्षांना आमंत्रण दिले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (AICC president Mallikarjun Kharge) यांनी सर्व प्रमुख नेते आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना औपचारिक निमंत्रण दिले आहे, तर सिद्धरामय्या यांनी एमके स्टॅलिन यांना फोनवर फोन करून शपथविधी समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. गांधी परिवार यावेळी उपस्थित राहणार आहे. (Karnataka News)

एका वृत्तानुसार, सिद्धरामय्यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची ११ नावे समोर आली आहेत. त्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रियांक खर्गे यांच्या मुलगा प्रियांक खर्गे यांचा समावेश आहे. (karnataka cabinet)

मंत्रिमंडळाची संभाव्य यादी

जी परमेश्वर

एमबी पाटील

प्रियांक खर्गे

केजी जॉर्ज

रूपा शशिधर

इश्वर खंदारे

जमीर अहमद खान

बीआर रेड्डी

तन्वीर सैत

लक्ष्मण सवदी

कृष्णा बायरे गौडा

'काही वेळा त्याग करावा लागतो', नाराज जी परमेश्वर यांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेले कर्नाटक काँग्रेसचे आमदार जी परमेश्वर यांनी शुक्रवारी 'काही वेळा आपल्याला त्याग करावा लागतो', अशी प्रतिक्रिया दिली आहे. "आपल्या सर्वांना कधी ना कधी त्याग करावा लागतो. ही चांगली गोष्ट आहे," असे जी परमेश्वर यांनी म्हटले आहे. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्रीपदाची अपेक्षा होती. पण हे पद न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत.

नवीन मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणाऱ्या आमदारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार आज दिल्लीला जाणार आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आणि राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी ते काल बंगळूरला परतले होते. २० मे रोजी सिद्धरामय्या यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे.

दरम्यान, या राजकीय घडामोडींदरम्यान एम.बी. पाटील आणि जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पद न मिळाल्याने नाराज असल्याचे वृत्त समोर आले आहे. जी परमेश्वर यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या दलित समाजाच्या मागणीवर एएनआयशी बोलताना पाटील म्हटले की, "ज्यांनी मतदान केले त्या लिंगायत, दलित, वोक्कलिगा, एसटी, मुस्लिम समाजातील लोकांना त्यांचा योग्य वाटा द्यावा लागेल. यावर पक्ष काहीतरी विचार करेल असा माझा विश्वास आहे. ते या सर्व समाजांना योग्य तो सन्मान देतील आणि सर्व समाजातील लोकांना सत्तेत स्थान दिले जाईल.

"लिंगायत समाजाने उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केली असून त्याबद्दल बोलताना पाटील म्हणाले की, मला विश्वास आहे की काँग्रेस पक्ष समाजाला योग्य स्थान देईल. "भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या लिंगायत समाजातील उमेदवारांना मतदारांनी नाकारले आहे. त्यामुळे साहजिकच जेव्हा आपण काँग्रेसकडे आलो आहोत, तेव्हा अपेक्षा जास्त आहेत. त्यांना योग्य वाटा हवा आहे. मला विश्वास आहे की आमचा पक्ष याची काळजी घेईल," असे ते म्हणाले.

कर्नाटक काँग्रेसचे आमदार आणि माजी राज्यमंत्री टीबी जयचंद्र यांनी एम बी पाटील आणि जी परमेश्वर यांना उपमुख्यमंत्री पद न मिळाल्याबद्दल नाराज असल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की "डी. के. शिवकुमार हे एकमेव उपमुख्यमंत्री राहतील. हा निर्णय हायकमांडचा आहे. त्यामुळे नाराजी वाढेल असे मला वाटत नाही."

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news