Karnataka CM : सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री; काँग्रेसकडून अधिकृत घोषणा | पुढारी

Karnataka CM : सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री; काँग्रेसकडून अधिकृत घोषणा

पुढारी ऑनलाइन डेस्क – Karnataka CM : सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील आणि डीके शिवकुमार हे एकमेव उपमुख्यमंत्री असतील, अशी घोषणा काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी केली. शिवकुमार हे लोकसभा निवडणुका संपेपर्यंत पीसीसी अध्यक्षपदी कायम राहतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा गट 20 मे रोजी शपथ घेतील, असे केसी वेणुगोपाल यांनी सांगितले आहे. दरम्यान, डी के शिवकुमार यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न याही वेळेला हुकले.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार

या घोषणेनंतर डी के शिवकुमार यांनी म्हटले आहे, “कर्नाटकचे सुरक्षित भविष्य आणि आमच्या लोकांचे कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि आम्ही याची हमी देण्यासाठी एकजूट आहोत.”

काँग्रेसने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री म्हणून अधिकृतपणे घोषणा केल्यानंतर डीके शिवकुमार मीडियासमोर हजर झाले. ते म्हणाले, सर्व काही ठीक आहे आणि चांगले होईल. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे आणि आम्ही ते स्वीकारले.

 

Back to top button