Karnataka Bandh: कर्नाटक बंदला संमिश्र प्रतिसाद; बेळगावमध्ये शून्य प्रतिसाद

Karnataka Bandh: कर्नाटक बंदला संमिश्र प्रतिसाद; बेळगावमध्ये शून्य प्रतिसाद
Published on
Updated on

बंगळूर: पुढारी वृत्तसेवा: कावेरी नदीचे पाणी तमिळनाडूला सोडण्यास विरोध करत पुकारण्यात आलेल्या कर्नाटक बंदला आज (दि.२९) संमिश्र प्रतिसाद लाभला. बंगळूरसह दक्षिण कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये बंद पाळण्यात आला. उत्तर कर्नाटकात मात्र व्यवहार पूर्णपणे सुरू आहेत. बंदची हाक देणाऱ्या काही नेत्यांना बंगळूर पोलिसांनी विधान भवनाजवळून ताब्यात घेतले आहे. दरम्यान पाणी वाटपाबाबत तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी दुपारी कर्नाटक केरळ आणि तामिळनाडूच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. (Karnataka Bandh)

येत्या 18 ऑक्टोबरपर्यंत तमिळनाडूला रोज ३ हजार क्युसेक पाणी सोडावे, असा आदेश कावेरी पाणी वाटप समितीने कर्नाटकाला दिला आहे. त्यानुसार कर्नाटकाने गेले आठ दिवस तामिळनाडूला पाणी सोडले होते. मात्र, कर्नाटकात भीषण दुष्काळ असून येथील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने तमिळनाडूला पाणी सोडू नये, अशी मागणी कन्नड संघटनांसह विरोधी पक्ष असलेल्या भाजप आणि निजदने केली होती. त्यासाठी बुधवारी दोन्ही पक्षांनी बंगळूरमध्ये संयुक्त निदर्शनेही केली होती. तेच आंदोलन पुढे नेत शुक्रवारी कर्नाटक बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमध्ये कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेतेही सहभागी झाले आहेत. (Karnataka Bandh)

कन्नड संघटनाच्या नेत्यांना बंगळूरमधील फ्रीडम पार्कवर आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी दिली होती. मात्र, काही नेत्यांनी विधानभवनाकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कन्नड चळवळ संघटनेचे नेते वाटाळ नागराजसह अनेक नेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Karnataka Bandh  : बेळगावसह सीमाभागात प्रतिसाद शून्य

कर्नाटक बंदला सीमा भागासह बेळगावमध्ये शून्य प्रतिसाद लाभला. सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. काही शाळांनी मात्र सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे काही काळ संभ्रमाचे वातावरण होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news