Naveen Sekharappa : नवीनच्या मृतदेहाच्या जागेत १०- १५ जण येतील

Naveen Sekharappa : नवीनच्या मृतदेहाच्या जागेत १०- १५ जण येतील
Published on
Updated on

बंगळुरू; पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनमध्ये गोळीबारात प्राण गमावलेल्या भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पाचा ( Naveen Sekharappa ) मृतदेह अद्याप परत आणता आलेला नाही. दरम्यान, कर्नाटकातील भाजप आमदार अरविंद बेलाड यांनी याप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नवीनचा मृतदेह विमानात जितकी जागा व्यापेल, त्याऐवजी १०-१२ लोकांना आणता येईल, असे बेताल वक्तव्य त्यांनी केले. हुबळी धारवाड पश्चिम येथील आमदार म्हणाले की, नवीनचा मृतदेह खार्किव, युक्रेन येथून आणण्यासाठी भारत सरकार तसेच कर्नाटक सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

ज्या ठिकाणी मृतदेह ठेवण्यात आले आहे ती जागा युद्धक्षेत्र असून सध्याच्या परिस्थितीत मृतदेह भारतात आणणे कठीण असल्याचे या भाजप आमदारांनी आवर्जून सांगितले. अरविंद बल्लाड म्हणाले, 'हे युद्धक्षेत्र आहे. तुम्ही दूरचित्रवाणीवर सर्व वाहिन्यांवरून तेथील परिस्थिती पाहत आहात. विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर पार्थिव आणले जाईल. ( Naveen Sekharappa )

जिवंत माणसांना आणणे कठीण झाले आहे ( Naveen Sekharappa )

अरविंद बल्लाड म्हणाले, 'अशा परिस्थितीत जिवंत माणसांना आणणे कठीण होत असताना मृतदेह आणणे अधिक कठीण होऊन बसेल, कारण मृतदेह अधिक जागा व्यापणार आहे. त्या ऐवजी 10 ते 12 लोकांना आणता येईल. या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने असेही सांगितले, की भरमसाट फी मुळे परदेशात वैद्यकीय पदवी मिळविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी भारताबाहेर जातात.
नवीनच्या पालकांनी केंद्र सरकारकडे कैफियत मांडली

कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील चालगेरी येथे राहणारा 22 वर्षीय नवीन हा खार्किवमध्ये इतरांसह एका बंकरमध्ये होता. तो 1 मार्च रोजी बंकरमधून खाद्यपदार्थ घेण्यासाठी आणि चलन बदलण्यासाठी बाहेर पडला होता आणि गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह खार्किवच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मुलाचा मृतदेह परत आणावा, अशी विनंती त्याच्या पालकांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

खार्किवपासून २० किमी अंतरावर असलेल्या शाळेत निवारा ( Naveen Sekharappa )

दरम्यान, चल्गेरी येथील व्यंकटेश वैश्यर यांनी सांगितले की, त्यांचा 23 वर्षांचा मुलगा आणि 24 वर्षांची पुतणी सुमन युक्रेनमध्ये आहेत आणि त्यांना खार्किव्हपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या एका शाळेत ठेवण्यात आले आहे. जिथे सुमारे 1700 भारतीय आहेत. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी त्यांच्या देशातील महिला आणि नागरिकांना प्राधान्य दिल्याने अमित आणि सुमन सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढू शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news