Kareena-Karishma : ३ क्वीन्सचा समुद्रात जलवा, मोनोकिनीनं वाढवलं तापमान

kareena-karishma and natasha
kareena-karishma and natasha

पुढारी ऑनलाईन डेस्क

कपूर सिस्टर्स समुद्रकिनारी जाऊन चिल करताना दिसत आहेत. करीना कपूर खान (Kareena-Karishma) तिची बहीण करिश्मा कपूर आणि मुलांसोबत मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. करीनाने (Kareena-Karishma) तिचा धाकटा मुलगा जेह अली खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचवेळी, या व्हेकेशनचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये करीना-करिश्माची गर्ल्स गँग समुद्राचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. करीना आणि करिश्मा कपूरची मैत्रीण नताशा पूनावाला हिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नताशा करीना, करिश्मा कपूरसोबत समुद्रकिनारी पोज देताना दिसत आहे.

करीना कपूर आणि करिश्मा कपूरची मैत्रिण नताशा पूनावालाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिच्या सुट्टीतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नताशा करीना आणि करीश्मासोबत समुद्रकिनारी पोज देताना दिसत आहे. एका फोटोत या तिघी पाण्याच्या मधोमध स्विमसूटमध्ये दिसत आहेत. करीनाने निऑन ग्रीन कलरचा तर करीश्माने ब्लॅक कलरची मोनोकिनी घातली आहे.

दोन्ही बहिणी ओल्या खुल्या केसांमध्ये ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसत आहेत. ही छायाचित्रे शेअर करताना नताशाने लिहिले, 'समुद्रात सर्वात आनंदी, माझ्या मैत्रीणी आणि त्यांच्या लाडक्या मुलांसोबत प्रवास…स्नॉर्कलिंग, गप्पा मारणे, आरामदायी जेवण आणि पोज देण्याचा दिवस'.

याआधी, या व्हेकेशनमधील कियान आणि तैमूरचा फोटो शेअर करताना करीनाने 'ब्रदर्स' असे लिहिले होते. तिने करीश्माला टॅगही केले होते. करीनाच्या या पोस्टवर कमेंट करताना बहीण करिश्मा कपूरने लिहिले, 'फक्त प्रेम. करीनाने जयदीप अहलावत आणि विजय वर्मासोबतच्या तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. सुजॉय घोषच्या दिग्दर्शनाखाली बनवल्या जाणाऱ्या वेब सीरिजमधून ही अभिनेत्री ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. यासोबतच करीना आमिर खानसोबत लाल सिंह चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news