कराड (सातारा) पुढारी वृत्तसेवा: कराड आगारातील बाळकृष्ण पाटील या एसटी चालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रक्षाविसर्जन विधीनंतर एसटी कर्मचार्यांनी कराड आगारात श्रद्धांजली कार्यक्रम घेत तीव्र शब्दात शासनाचा निषेध नोंदवला आहे. तसेच भविष्यात लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले.
राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील तसेच माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्याचा ठराव करण्यात आला. पाटण आगाराचे निवास शेजवळ म्हणाले, आमचा लढा सुरूच राहणार आहे.
जे कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांनाही आपल्यामध्ये समाविष्ट करा. आपल्या विलगीकरणाचे काम अंतिम टप्यात आले आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचीही भेट घेणार आहे.
जयवंत शेळके म्हणाले, कर्मचारी कामावर नाहीत म्हणून दोन, तीन दिवसांचे प्रशिक्षण देऊन बाहेरच्या लोकांना कामावर घेतले जात असून हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचे सांगितले. तर अन्य काही कर्मचार्यांनी आमच्या परिस्थितीचा विचार न करणार्या लोकप्रतिनिधींना पुढील निवडणुकीत आमच्याकडेच यावे लागणार आहे.
त्यावेळी त्यांचा विचार केला जाईल असा इशारा दिला आहे. दिपाली मोहिते, शीतल धुमाळ, किसन कुंभार, जोतीराम कुंभार, गणेश काळे, अहमद तांबोळी, दिलीप भिसे, आनंदराव मोहिते, युवराज साळुंखे, जे. डी. कुंभार, एस. व्ही. कांबळे, विजय पाटील तसेच अन्य आगारातील कर्मचारी उपस्थित होते.
मोफत प्रवासास मनाई कशासाठी?
एसटी कर्मचार्यांना कोठेही मोफत प्रवास करता येतो. मात्र जे कर्मचारी संपात आहेत, त्या कर्मचार्यांना कामावर असणारे कर्मचारी कोणताही अध्यादेश नसताना मोफत प्रवास देत नाहीत.
कर्मचारी संपात आहेत, त्यांना काढून टाकले नाही मग अशी अरेरावी का? असा संतप्त सवाल यावेळी कर्मचार्यांनी केला.
हेही वाचा