Kangana Ranaut : २०१९ मध्ये जे घडलं तेच २०२४ मध्ये होणार; कंगना लोकसभा निवडणूक लढवणार?

कंगना रनौत
कंगना रनौत

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री कंगना रणौतने ( Kangana Ranaut) रविवारी हरिद्वार जाऊन गंगा आरती केली. तिने प्रवासादरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबद्दल प्रतिक्रिया दिली. ती लोकसभा निवडणूक लढवणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. हरिद्वारमध्ये तिने भविष्यातील योजनांबाबत बातचीत केली. ( Kangana Ranaut)

कंगना आगामी चित्रपट इमरजन्सीची तयारी करत आहे. या दरम्यान, हरिद्वारची यात्रा करताना तिने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबतही प्रतिक्रिया दिली.

कंगना म्हणाली, निवडणुकीबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे. पण, २०१९ मध्ये जे घडले होते ते २०२४ मध्येही घडेल. तमिळ अभिनेत्री ते राजकीय नेत्या झालेल्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपट थलाईवीच्या प्रचारादरम्यान, कंगना म्हणाली होती-जर तिच्या प्रशंसकाची इच्छा असेल तर ती निश्चितपणे राजकारणात उतरेल.

दरम्यान, कंगनाने दिगेदर्शित केलेला इमरजन्सी चित्रपटाची प्रतीक्षा चाहत्यांना लागून राहिली आहे. अनुपम केरस महिमा चौधरी, विशाक नायर, श्रेयस तळपदे यासारख्या कलाकारांची मुख्य भूमिका यात असेल. तसेच कंगना चंद्रमुखी २ मध्ये ही दिसणार आहे. यामध्ये कंगना एका राज दरबारातील नर्तकीची भूमिका साकारेल. त्याचबरोबर, कंगना मणिकर्णिका रिटर्न्स : द लीजेंड ऑफ दिद्दा आणि द अवतार : सीता मध्येही दिसणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news