Kamal Haasan : ‘विक्रम’च्या निमित्ताने कमल हासनची साऊथ विरुद्ध बॉलिवूड वादात उडी

Kamal Haasan : ‘विक्रम’च्या निमित्ताने कमल हासनची साऊथ विरुद्ध बॉलिवूड वादात उडी

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या सर्वत्र साऊथ चित्रपटांचा दबदबा वाढत असल्याचे पहायला मिळत आहे.  बाहुबली १ व २, केजीएफ १ व २, आरआरआर, पुष्पा या चित्रपटांनी कोटीच्या कोटी उड्डाने पार केली.  यांच्या पुढे बॉलिवूडचे चित्रपट मात्र फ्लॉप होताना दिसत आहेत. साऊथच्या चित्रपटांनी आपला पॅन इंडिया प्रेक्षक जोडायला सुरु केले आहे. यामुळे सध्या साऊथ सिनेमा विरुद्ध बॉलिवूड (Bollywood vs South Indian Movies) असा वाद चांगलाच रंगला आहे. या वादात दिग्गज अभिनेता कमल हासन (Kamal Haasan) यांनही उडी घेतली आहे. कमल हासन याचा बऱ्याच दिवसांनी चित्रपट येत आहे.  कमल हासन याची देशभरात फॅन फॉलोइंग आहे. त्‍यांचा 'विक्रम' (Vikram 2022) हा चित्रपट ३ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kamal Haasan (@ikamalhaasan)


अभिनेता  कमल हासन (Kamal Haasan) यांच्‍या इतके प्रयोग कदाचितच दुसऱ्या अभिनेत्‍याने केले असतील. त्याच्या प्रत्येक चित्रपटात नाविन्य असते. तसेच प्रेक्षकांना नवे आणि अदभूत असं काही वेगळं देण्याचा त्याचा ध्यास असतो. साऊथमध्ये त्याचा दबदबा आहे, त्या प्रमाणे बॉलिवूडमध्ये देखील त्याचा दबदबा आहे. अगदी रजनिकांत (Rajinikanth) , नागारार्जुन (Nagarjuna), चिरंजीवी (Chiranjivi) असे अनेक अभिनेते साऊथ मधून आले पण, त्यांना बॉलिवूडमध्ये फारसा जम बसवता आला नाही. पण, या सर्वांना कमल हासन अपवाद ठरला. त्याने साऊथ प्रमाणे बॉलिवूडमध्ये देखील आपले नाणे खणखणीत वाजवले. अगदी 'सदमा', 'एक दुजे के लिए' पासून ते अगदी 'विश्वरुपम' पर्यंत त्याचे चित्रपट चालले. त्याच्या सिनेमातील प्रयोगांना नेहमी प्रेक्षकांची दाद मिळाली. अप्पू राजा, हिंदुस्तानी, चाची चारसौ बीस या चित्रपटांनी अक्षरश: वेड लावलं. त्यामुळे दोन्ही सिनेसृष्टीत कमल हासन हे नाव तितक्याच आदराने घेतले जाते.

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर ते आपल्या चाहत्यांसाठी 'विक्रम' नावाचा चित्रपट तो घेऊन येत आहे. हा चित्रपट ३ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्याच्या सोबत विजय सेतुपती (Vijay Sethupathi) आणि फहद फासिल (Fahad Fazil) हे दोन साऊथचे दिग्गज कलाकार सुद्धा दिसणार आहेत. याच निमित्ताने एका मुलाखतीमध्ये कमल हासन (Kamal Haasan)  याने साऊथ सिनेमा आणि बॉलिवूडच्या वादात विषयी भाष्य केले.

चांगल्‍या कलाकृतीला प्रेक्षकांकडून दाद मिळतेच

यावेळी बोलताना कमल हासन म्हणाले, सुरुवातीपासूनच भारतात विविध भाषांमध्‍ये चित्रपट निर्माण केले जातात. तसेच आधीपासून चित्रपट अगदी संपूर्ण भारतभर प्रदर्शित केले जातात. 'मुगल-ए-आजम', 'पडोसन' सारखे चित्रपट त्या काळी संपूर्ण भारतात पाहिले गेले. तसेच साऊथचे देखिल अनेक चित्रपट या आधी देखिल संपूर्ण भारतात पाहिले गेले. त्यांना पसंती देखील मिळाली. भारतात अनेक ठिकाणी विविध भाषा बोलल्या जातात, तरी देखील आपण सर्वजण एक आहोत. हे या देशाचं वैशिष्ट आणि सौंदर्य आहे. जी कलाकृती चांगली असेल त्याला प्रेक्षकांकडून दाद मिळत राहिल, असे मत कमल हासन याने यावेळी व्यक्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news