

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांना मातृशोक झाला आहे. शुक्रवारी २७ मे रोजी त्यांच्या मातोश्री शुभांगी जाधव (Shubhangi Jadhav) यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७४ वर्षांच्या होत्या. स्वतः रवी जाधव यांनी इन्स्टाग्रामवर आईचा फोटो शेअर करत ही दुःखद बातमी दिली.
शुक्रवारी रवी जाधव (Ravi Jadhav) यांच्या आईंचे निधन झाले. यामुळे रवी जाधव व त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वर्षाभरापूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. रवी यांनी इन्स्टाग्रामवर आईचा फोटो शेअर करत त्याला 'आई' असे कॅप्शन दिले आहे. त्यासह त्यांनी हार्ट इमोजी जोडला आहे. रवी जाधव यांची पोस्ट समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली वाहिली. अनेक सेलिब्रिटी आणि चाहते रवी जाधव यांचे सांत्वन करत आहेत. त्यांचे जवळचे नातेवाईक व चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांना धीर देत आहेत.
वर्षाभरापूर्वी ९ जानेवारी २०२१ रोजी रवी जाधव यांच्या वडिलांचे निधन झाले होते. अवघ्या वर्षाभरात आई-वडिलांचे छत्र हरपल्याने रवी जाधव यांच्या आयुष्यात न भरुन घेणारी पोकळी निर्माण झाली आहे. वडील गेल्यावर त्यांनी भावनिक पोस्ट केली होती. त्यावेळी त्या पोस्टमध्ये त्यांनी 'आजही ते कासे गावातील श्री देव गजाननाच्या देवळाजवळ एखादे सुंदर फुलपाखरु होऊन छान बागडत असतील''असे त्यांनी लिहले होते.
मी पत्रकार परिषदेत सत्य तेच बोललो : संभाजीराजे https://t.co/XhaqyNLxPW #Pudharionline #Pudharinews #राज्यसभा #संभाजीराजे