काजल अग्रवाल हिचे ‘ते’ फोटो व्हायरल

kajal aggarwal
kajal aggarwal
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

'सिंघम' चित्रपटातून अनेकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल. तिने 2020 मध्ये उद्योगपती गौतम किचलूशी लग्न केले. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता काजल प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगत आहेत. या चर्चा काजलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे सुरू झाल्या आहेत.

काजलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या मैत्रिणीसोबत वेळ घालवताना दिसत आहे. तसेच, तिने घातलेल्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. या फोटोवरून ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

काजल लवकरच गुड न्यूज देणार असे म्हटले जात आहे; पण याबाबत काजल किंवा तिचा पती गौतम यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या काजल स्वत:ला वेळ देत असल्याचे देखील म्हटले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news