Kabbadi : भारत कबड्डीत आठव्यांदा आशिया चषक विजेता

Kabbadi : भारत कबड्डीत आठव्यांदा आशिया चषक विजेता

बुसान-कोरिया; वृत्तसंस्था : भारतीय पुरुष कबड्डी संघाने इराणला धूळ चारत आशियाई कबड्डी स्पर्धेचे विक्रमी आठव्यांदा जेतेपद प्राप्त केले. अतिशय अटीतटीने लढवल्या गेलेल्या अंतिम लढतीत भारताने 42-32 अशा फरकाने निसटता विजय संपादन केला. इराणने या अंतिम लढतीत अतिशय आक्रमक सुरुवात केली; पण तो जोश ते शेवटपर्यंत कायम राखू शकले नाहीत. उलटपक्षी, भारताने संधी मिळताच जोरदार मुसंडी मारत जेतेपदावर कब्जा केला. (Kabbadi)

भारतीय कर्णधार पवन सेहरावतने अतिशय उत्तम खेळी साकारत संघाला एकवेळ 10-4 अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली होती. या जोरावर भारताने इराणवर सातत्याने वर्चस्व राखले. मध्यंतरापर्यंत भारतीय संघ 23-11 अशा उत्तम आघाडीवर होता. (Kabbadi)

दुसर्‍या सत्रात इराणचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मदरेझा चियानेहने आक्रमणावर भर देत पिछाडी भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला; पण सहकार्‍यांची अपेक्षित साथ न लाभल्याने यात तो यशस्वी होऊ शकला नाही. भारताने मात्र आपली आघाडी अखेरपर्यंत कायम राखली आणि जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ट्विट करत संघाचे अभिनंदन केले. भारताने यापूर्वी 2017 साली इराणमध्ये संपन्न झालेल्या मागील आशियाई स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत जेतेपद संपादन केले होते. तोच कित्ता त्यांनी येथे इराणला हरवून पुन्हा एकदा गिरवला.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news