War 2 : वाढदिनी ज्यु. एनटीआरचा मोठा धमाका, विलेनच्या भूमिकेत दिसणार

jr ntr
jr ntr

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथेच असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी दक्षिण इंडस्ट्रीसोबत हिंदी चित्रपटामध्येही आपलं नाव कमावलं आहे. या साऊथ कलाकारांचीही बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण झालीय. (War 2 ) अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, नयनतारा, सामंथा रुथ प्रभू आणि रामचरण यांसारख्या कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. या सर्वांशिवाय आणखी एक कलाकार आहे, ज्याने बॉलिवूडसह परदेशातही नाव कमावले आहे. (War 2) अभिनेता ज्युनियर एनटीआरचा आज ४० वा वाढदिवस आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी-

NTR हा तेलुगु अभिनेता आहे. अभिनेता एनटीआरचा जन्म २० मे, १९८३ रोजी हैदराबादमध्ये झाला. हा अभिनेता सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे, जो एका चित्रपटासाठी प्रचंड रक्कम घेतो. Jr NTR ने दोन फिल्मफेअर पुरस्कार, दोन राज्य नंदी पुरस्कार आणि चार सिनेमा पुरस्कार जिंकले आहेत. याशिवाय त्याच्या नाटू-नाटू या गाण्यालाही ऑस्कर मिळाला होता.

ज्युनिअर एनटीआर हृतिक रोशनसोबत अयान मुखर्जीच्या वॉर २ चित्रपटातही दिसणार आहे. एनटीआर या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय त्याने RRR, NTR 30, जय लावा कुसा, सिंहाद्री, बादशाह सारखे उत्कृष्ट चित्रपट केले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news