Jofra Archer : इंग्लंडला मोठा धक्का, जोफ्रा आर्चर अॅशेस मालिकेतून बाहेर

Jofra Archer : इंग्लंडला मोठा धक्का, जोफ्रा आर्चर अॅशेस मालिकेतून बाहेर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून फक्त 5 सामने खेळून गेल्या आठवड्यात मायदेशी परतलेला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आता 2023 च्या ॲशेस मालिकेतूनही बाहेर पडला आहे. त्याच्या कोपराची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. त्यामुळे 1 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार्‍या एकमेव कसोटी सामन्यासाठी आणि त्यानंतरच्या ॲशेस मालिकेसाठी आर्चर संघाचा भाग असणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

जोफ्रा 2 वर्षांपासून कसोटी क्रिकेटपासून दूर (Jofra Archer)

आर्चर गेल्या 2 वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. त्याने शेवटचा कसोटी सामना मार्च 2021 मध्ये खेळला होता. तेव्हापासून त्याला कोपर आणि पाठीच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर रहावे लागले आहे. अलीकडे जोफ्रा आर्चर बरा झाला आणि त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळायला सुरुवात केली, पण त्याची जुनी दुखापत पुन्हा उफाळून आली आणि आता तो पुन्हा बराच काळ मैदानाबाहेर गेला आहे. आर्चर (Jofra Archer) यंदाच्या आयपीएल हंगामात केवळ 5 सामने खेळून गेल्या आठवड्यात मायदेशी परतला.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची ॲशेस मालिका 16 जूनपासून सुरू होत आहे. अशातव आर्चरच्या बाहेर पडल्याने इंग्लंडला निश्चितच मोठा फटका बसला आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना 16 जून ते 20 जून दरम्यान खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर दुसरा कसोटी सामना 18 जूनपासून लंडनमध्ये खेळवला जाणार आहे. तिसरा कसोटी सामना 6 जुलैपासून तर चौथा कसोटी सामना 19 जुलै रोजी सुरू होईल. या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना 27 जुलैपासून लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळवला जाणार आहे.

जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) मुंबई इंडियन्ससाठी वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करणे अपेक्षित होते. पण तो 10 पैकी फक्त 5 सामने खेळू शकला. त्याने 9.50 च्या इकॉनॉमीमध्ये फक्त 2 बळी घेतले. आर्चर 2020 मध्ये कोपरच्या दुखापतीमुळे त्रस्त झाला होता. 2021 च्या सुरुवातीला तो मैदानात परतला, पण दुखापतीमुळे तो पुन्हा क्रिकेटपासून दूर गेला. मे 2022 मध्ये त्याला पाठीचा त्रास सुरू झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news