पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीच्या वेगवान घडामोडी घडत आहे. आज (दि.३ जून) गुरूपौर्णिमा आहे. यानिमित्त राजकीय नेतेही आपल्या गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहेत. ज्यांची राष्ट्रवादीचे प्रतोद म्हणून निवड झाली ते राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील त्यांच्या गुरूंना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जितेंद्र आव्हाड या नावाची ओळख माझे गुरू शरद पवार यांच्यामुळे आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वेळोवेळी संधी देत त्यांनी मला आज इथवर आणले आहे. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत शरदचंद्रजी पवार यांच्या नावासाठी लढू." जितेंद्र आव्हाड यांनी गुरूपौर्णिमेनिमित्त त्यांचे राजकीय गुरू शरद पवार यांचा फोटो ट्विटरवर शेअर करत, शरद पवार आणि जीवनातील इतर गुरूंनी (Jitendra Awhad) देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
रविवारी राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनी सत्ताधारी पक्षांना पाठिंबा दिला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी आणि विरोधी पक्षनेते पदी विधा सभेचे सदस्य म्हणून जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली, असे पत्र राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा गटनेते जयंत पाटील यांनी दिले होते.