ajit pawar latest news : अजित पवारांसह ९ आमदार अपात्र ठरणार? विधानसभा अध्यक्षांकडे राष्ट्रवादीची याचिका सादर | पुढारी

ajit pawar latest news : अजित पवारांसह ९ आमदार अपात्र ठरणार? विधानसभा अध्यक्षांकडे राष्ट्रवादीची याचिका सादर

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ९ आमदारांविरूद्ध अपात्रतेची याचिका सादर केली असून ती मला प्राप्त झाली आहे. याचिका वाचून व त्यामध्ये नमुद केलेल्या मुद्द्यांचा अभ्यास करून योग्य निर्णय घेईन, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले की, विरोधी पक्षनेता निवडण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना आहे. हा अधिकार बजावत असताना विधानसभा अध्यक्षांना संविधानीक तरतुदी आणि विधानसभेच्या नियमांचे पालन करूनच निर्णय घेतला जाईल. जयंत पाटील यांनी ९ आमदारांविरूद्ध अपात्रतेची याचिका सादर केली आहे. ती मला प्राप्त झाली आहे. ती वाचून योग्य निर्णय घेईन, याचिकेचे वाचन केल्याशिवाय अपात्रतेबाबत काही सांगू शकत नाही, असे विधान नार्वेकर यांनी केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button