सिन्नर तालुक्यात लष्करी जवानाचे अपघाती निधन

जवान अमोल शिंदे
जवान अमोल शिंदे

सिन्नर; पुढारी वृत्तसेवा : लष्करी जवानाचे अपघाती निधन : तालुक्यातील ठाणगाव येथील जवान अमोल विलास शिंदे (वय २४) याचे शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास अपघाती निधन झाले.

सिन्नर-ठाणगाव रस्त्यावर आटकवडे शिवारात हा अपघात झाला. चार-पाच दिवसांपूर्वी तो सुट्टीवर आलेला होता. वैयक्तिक काम आटोपून मोटारसायकलने सिन्नर येथून ठाणगावकडे निघाला होता. हा अपघात नेमका कसा झाला हे समजू शकलेले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

अमोल सध्या पश्चिम बंगाल येथे कर्तव्य बजावत होता. तो अविवाहित होता. जवान अमोल याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, चुलते, चुलती असा परिवार आहे. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचलं का?

[visual_portfolio id="37929"]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news