Jammu-Kashmir : पाकची पुन्हा आगळीक; सीमेपलीकडून गोळीबार, ‘BSF’ अधिकारी जखमी

Jammu-Kashmir : पाकची पुन्हा आगळीक; सीमेपलीकडून गोळीबार, ‘BSF’ अधिकारी जखमी

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  पाकची पुन्हा आगळीक. जम्मू-काश्मीरमधील रामगडमध्ये सीमेपलीकडून  पाकिस्तानी सैनिकांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. ज्याला बीएसएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले," बीएसएफने एका निवेदनात म्हटले आहे. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारातसीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान जखमी झाला. आहे. ही घटना बुधवारी (दि.८) रात्री उशिरा घडली.

बीएसएफच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी रेंजर्सनी काल रात्री उशिरा रामगढ आणि अरनिया सेक्टरमध्ये विनाकारण गोळीबार केला. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफचा एक जवान जखमी झाला असून त्याला स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. स्थानिक रहिवासी नरिंदर कौर सांगतात, "रात्री गोळीबार सुरू झाला. पहाटे चारच्या सुमारास आम्हाला याबाबत कळले. यावेळी आम्ही आमच्या मुलांसह स्टोअर रूममध्ये झोपलो होतो. शाळांनी सांगितले आहे की बस येथे येणार नाही आहे. आणि आमचे गाव सीमेजवळ असल्याने आम्ही आमच्या मुलांना जवळच्या गावात घेऊन जात आहोत, तेथून शाळा आमच्या मुलांना घेऊन जातील."

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news