Maharashtra Cabinet Decision: धनगर समाजाच्या उन्नती करिता योजना राबविणार : राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Maharashtra Cabinet Decision: धनगर समाजाच्या उन्नती करिता योजना राबविणार : राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्य मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.८) बैठक झाली. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यासंदर्भात सीएमओच्या 'X' खात्यावर पोस्ट केले आहेत. महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे, (Maharashtra Cabinet Decision)

Maharashtra Cabinet Decision : महत्वपूर्ण निर्णय…

  • धनगर समाजाच्या उन्नती करिता योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तीप्रदत्त समिती. (इतर मागास बहुजन कल्याण) 
  • राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. ४२५० कोटी तरतुदीस मान्यता (उद्योग विभाग)
  • मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना फायदा. २२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार. (जलसंपदा विभाग)
  • अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरणार. (वैद्यकीय शिक्षण)
  • मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा.(वस्त्रोद्योग विभाग)
  • गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची २८२ पदे भरणार. (इतर मागास बहुजन कल्याण)
  • विदर्भात ५ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार. संत्रा उत्पादकाना मोठा फायदा. (सहकार विभाग)
  • मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणार. (पर्यटन विभाग)
  • बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार (गृह विभाग)
  • महाराष्ट्र बोव्हाईन ब्रिडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापणार. रेतन केंद्रे रोगमुक्त करणार(पशुसंवर्धन)
  • नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले. एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व दंड माफ. ( सार्वजनिक बांधकाम विभाग)

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news