पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा रविवारी (दि.८) एक डिपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रश्मिकाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कृत्रीम बुद्धीमत्तेच्या गैरवापर करुन एखाद्या व्यक्तीच्या प्रतिमेवर किती वाईट परिणाम केले जाऊ शकतात? होतात? यावर चर्चा सुरु झाली होती. अनेक तज्ज्ञांनी याबाबत मते व्यक्त केली. रश्मिकाही या व्हिडिओबाबत व्यक्त झाली होती. (Rashmika's deepfake Video)
रश्मिकाने आपल्या 'X' खात्यावर एक पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली होती. तिने म्हटलं की, "मी शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना माझ्यासोबत असे घडले असते तर मी त्याला कसे सामोरे जाऊ शकले असते याची मी खरोखर कल्पना करू शकत नाही." दरम्यान, रश्मिकाच्या या डीपफेक व्हिडिओमध्ये मॉर्फिंगसाठी वापरण्यात आलेली तरुणी समोर आली आहे. झारा पटेल असे या तरुणीचे नाव आहे. (Rashmika's deepfake Video)
या व्हिडिओ प्रकरणी ती इन्स्टाग्रामवर व्यक्त झाली आहे. इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिने लिहिले की, "सर्वांना नमस्कार, माझ्या लक्षात आले आहे की, माझा आणि एका एका अभिनेत्रीचा चेहरा वापरून डीपफेक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. डीपफेक व्हिडिओमध्ये माझा कोणताही सहभाग नव्हता आणि जे काही घडत आहे. त्यामुळे मी खूप व्यथित आणि अस्वस्थ आहे." (Rashmika's deepfake Video)
"मला त्या स्त्रिया आणि मुलींच्या भविष्याची चिंता वाटते ज्यांना आता सोशल मीडिया हँडल करण्याची भीती वाटते. कृपया एक पाऊल मागे घ्या आणि तुम्हाला इंटरनेटवर काय दिसते ते तपासा. इंटरनेटवरील सर्व काही खरे नाही. जे काही घडत आहे त्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे.", अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली आहे. (Rashmika's deepfake Video)
हा सिंथेटिक मीडियाचा प्रकार आहे. एखादा फोटो किंवा व्हिडिओतील व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याने रिप्लेस करता येतो. अशा पद्धतीने बनावट फोटो किंवा व्हिडिओ बनवणे यात फारसे काही नवीन नाही. पण Deep Fake मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून अतिशय तंतोतंत बनावट व्हिडिओ किंवा फोटो बनवला जातो. चेहऱ्यावरील अनैसर्गिक भाग, डोळे आणि डोके यांच्यात समन्वय नसणे यातून Deep Fake व्हिडिओ ओळखता येतो. (Rashmika's deepfake Video)